आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे जगातील इटुकला पिटुकला देश, येथे राहतात केवळ 27 लोक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वात लहान देश सीलँड.
तुम्हाला केवळ 27 लोक राहणा-या देशाविषयी माहित आहे का? कदाचित नसेल. परंतु असा एक देश या पृथ्वीवर आहे. हा देश इंग्लंड जवळ स्थित असून त्याचे नाव सीलँड आहे. इंग्लंडच्या सफोल्क समुद्र किना-यापासून जवळपास 10 किलोमीटर दूर अंतरावर सीलँड ओसाड पडलेल्या समुद्री किल्ल्यावर स्थित आहे. याचा दुस-या वर्ल्ड वॉरदरम्यान ब्रिटेनकडून खुलासा झाला होता. नंतर याला रिकामे करण्यात आले.
मायक्रो नॅशन म्हटले जाणा-या सीलँडवर विविध लोकांचा कब्जा केलेला आहे. 9 ऑक्टोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत:ला सीलँडचा प्रिन्स म्हणून घोषित केले होते. रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर यावर त्याचा मुलगा मायकलचे राज्य होते. मायक्रो नॅशन अशा देशांना म्हटले जाते, ज्यांना आतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नाहीये. सीलँडचे क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किलोमीटर) आहे. ओसाड पडलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबतच लफ फोर्ट नावानेसुध्दा ओळखले जाते.
डोनेशनमुळे चालते अर्थव्यवस्था-
सीलँडचे क्षेत्रफळ खूप कमी आहे, त्यामुळे याच्या आसपास उपजीविकेचे कोणतेच साधन नाहीये. जेव्हा लोकांना पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यामातून याविषयी माहित झाले तेव्हा लोकांनी या देशाला दान देण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे राहणा-या लोकांना मदत मिळाली. फेसबुकवर प्रिन्ससिपॅलिटी ऑफ सीलँडच्या नावाने या लहान देशाचे एक पेजसुध्दा बनवण्यात आले आहे, याला 92 हजार लोकांनी लाइक केले आहे. तसेच या छोट्या देशाची सैर करण्यासाठी पर्यटकसुध्दा येतात.
मान्यता प्राप्त सर्वात लहान देश आहे वेटिकन सिटी-
सीलँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली नाहीये. त्यामुळे जगातील सर्वात लहान देश वेटिकन सिटी आहे. याचे क्षेत्रफळ 0.44 चौ. किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे. मात्र दिवसा काम करणा-या लोकांची संख्या 1000 आहे. येथे अनेक शानदार इमारती आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सर्वात लहान देशाचे खास फोटो...