आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीला जाते ही महिला, घरी मुलांसोबत असे करतो तिचा पती, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच्या पगारात घर चालवणे म्हणजे, तारेवर कसरत करण्यासारखेच आहे. त्यात मुलांना घरी सोडून नोकरीला जाणार्‍या महिलांची समस्या तर विचारायलाच नको. मुले घरी काय करतात? व्यवस्थित राहातात की नाही? बरं पती घरी असूनही त्यांची काळजी घेत असेल की नाही? असे एक ना अनेक प्रश्न नोकरदार महिलांच्या डोक्यात पिंगा घालत असतात.

याच पार्श्वभूमीवर एका महिलेच्या पतीने काही फोटोज आणि एक व्हिडिओ सोशल साइट्सवर शेअर केला आहे. अल्पावधीत हे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या फोटोज आणि व्हिडिओमध्ये पती मुलांची काळजी घेताना दिसत आहे.
ही घटना मिसौरीच्या कंसास सिटीमधील आहे. एमियो टोमेओनी, घरी राहून ऑफिसचे काम करतो तर त्याची पत्नी ऑफिसात जाते. दिवसभरात ती पतीला वारंवार फोन करून मुलगा जेव्हिअरची विचारपूस करते. एके दिवशी एमियोने दिवसभरात मुलासोबत काही फोटो क्लिक केले. तसेच व्हिडिओ देखील शूट केला. यात तो सकाळी मुलासोबत खेळतो, दुपारी त्याला जेवू घालताना दिसत आहे. इतकेच नाही तर तो मुलासोबत मस्ती करतो. त्याची आंघोळ घालतो, मसाज करतो.

एमियो आणि त्याचा 21 महिन्यांचा मुलगा जेव्हिअरचे फोटोज आणि व्हिडिओ आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तसे पाहिले तर हा व्हिडिओ खूप जुना आहे. पण, तो सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एमियो आणि त्याचा मुलगा जेव्हिअरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...