आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याच्या या दिवशी, या वेळी लोक आपल्या पार्टनरला करतात चीट, हे आहे यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोक आपल्या पार्टनरला कुठल्या दिवशी आणि किती वाजता दगा देतील,  हे तुम्ही सांगू शकता का?  खरं तर याचे उत्तर नाही हे आहे. कारण एखादी व्यक्ती तिच्या जोडीदाराला कधी आणि कसा दगा देईल हे त्या-त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. मग एखादी व्यक्ती ठराविक दिवशी ठराविक वेळेतच चिटिंग करते? हे कसे म्हणता येईल? पण एका डेटिंग वेबसाइटने केलेल्या सर्वेक्षणानुसार अचुक दिवस आणि वेळ समोर आली आहे. या सर्वेक्षणातून जे निकाल समोर आले आहेत, ते अतिशय रंजक आहेत. 

असे झाले सर्वेक्षण... 
- इलिसिट एनकाउंटर्स ही ब्रिटनची प्रसिद्ध डेटिंग वेबसाइट आहे. त्यांचे 10 लाख लोक मेंबर्स असल्याचा या साइटचा दावा आहे. या साइटच्या नावावरुनच ही साइट  इलिगल (अवैध) डेटिंगसाठी लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे दिसून येते. 
- या वेबसाइटच्या माध्यमातून लोक आपली खरी ओळख लपवून एखाद्या व्यक्तीसोबत कॉफी डेट किंवा अनैतिक संबंधांच्या शोधात असतात.
- इलिसिट एनकाउंटर्सवर मेसेजिंगची सुविधा उपलब्ध आहे. लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसीसोबत भेट ठरवण्यासाठी या मेसेजिंग सुविधाची मदत घेत असतात. या वेबसाइटने याच मेसेजेसवरुन एक अभ्यास केला आहे. या वेबसाइटच्या मेंबर्समध्ये 45 टक्के महिला आणि 55 टक्के पुरुषांचा समावेश आहे. आपल्या जोडीदाराला एखादी व्यक्ती का आणि कसा दगा देते, याचे निष्कर्ष महिला आणि पुरुषांवर सारखे लागू पडतात.  
- या वेबसाइटवर तासाभराला 600 मेसेजची देवाण-घेवाण होत असते. पण आठवड्याच्या दोन दिवशी या मेसेजची संख्या अचानक झपाट्याने वाढते.  
- ठराविक दोन दिवशी सुमारे 2000 मेसेज येतात. हे दोन दिवस आहेत सोमवार आणि शुक्रवार. या दोन्ही दिवसांची वेळ मात्र वेगळी आहे. सोमवारी लोक सकाळी  8 ते 9 याकाळात आपल्या प्रियकर-प्रेयसीला सर्वाधिक मेसेज पाठवतात. तर याउलट शुक्रवारी सर्वाधिक मेसेजची देवाण-घेवाण ही रात्री 9 ते 10 या काळात होते. 
- सोमवारी आणि शुक्रवारीच मोठ्या प्रमाणात चीटिंग का होते, यामागे एक कारण आहे. असे कामाचे शेड्यूल आणि कौटुंबिक कारणांमुळे होत असल्याचे समोर आले आहे.

पुढे वाचा, सोमवारी सकाळी आणि शुक्रवारी रात्रीच्या वेळेतच का होते सर्वाधिक चीटिंग...  
बातम्या आणखी आहेत...