आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील सर्वात सुंदर महिला कोण? सोशल साईटवर आली अशी उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात जेव्हाही सुंदर महिलांचा विषय निघतो तेव्हा बॉलिवूडच्या अॅक्ट्रेसेसचेच नाव घेतले जाते. तसेच अनेक वेळा काही खेळाडू आणि पॉलिटिशियनची नावेही समोर येत असतात. पण जेव्हा देशाच्या सुंदर महिलांबाबत लोकांकडून मते मागितली तेव्हा काही वेगळीच नावे समोर आली. 

क्वोरावर लोकांनी दिली अशी उत्तरे 
नुकताच क्वोरा (Quora) नावाच्या सोशल वेबसाइटवर लोकांना भारतातील सर्वात सुंदर महिला कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. लोकांनी त्यावर विविध प्रकारची उत्तरे दिली. कोणी सोशल अॅक्टीव्हीस्ट अरुणा रॉय तर कोणी अॅसिड व्हिक्टीम लक्ष्मी अग्रवालला देशातील सर्वात सुंदर महिला म्हटले. इतरही अनेक महिलांची नावे यूझर्सने घेतली. 

नीरजा भनोट.. 
दिल्ली युनिव्हर्सिटीची कॉमर्सची विद्यार्थिनी असलेली मनीषा कुमारी हिच्या मते देशातील सर्वात सुंदर महिला, फ्लाइट अटेंडंट नीरजा भनोट आहे. नुकताच तिच्या जीवनावर चित्रपटही येऊन गेला. सोनम कपूरने नीरजाचे पात्र साकारले होते. मनिषाच्या मते सोनम तिच्या भूमिकेत जेवढी सुंदर दिसत होती, कदाचित त्यापेक्षा जास्त सुंदर ती प्रत्यक्षात असेल. मुंबईची राहणारी नीरजा भनोट पार्ट टाइम मॉडेल आणि फूल टाइम फ्लाइट अटेंडंट होती. 1986 मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने 360 जणांचे प्राण वाचवले होते. मनिषाच्या या उत्तराचे सुमारे दोन हजार लोकांनी समर्थन केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर काही लोकांचे काय म्हणणे होते.. 

 
बातम्या आणखी आहेत...