आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unbelievable : या आईने गर्भातून स्वतः काढले आपले बाळ, पाहा अचंबित करणारी छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. कारण एका आईने आपल्या गर्भातून स्वतः बाळाला बाहेर काढले. सिझेरियनच्या माध्यमातून या बाळाचा जन्म झाला आहे. सविस्तर वृत्त असे, की 31 वर्षीय साराह डाउन्स नावाच्या महिलेने अलीकडेच आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. साराह मुळची ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलँडची रहिवाशी आहे. साराहची नॉर्मल डिलिव्हरी होणार नसून काही कारणास्तव सिझेरियन करावे लागेल, याची कल्पना सुरुवातीपासूनच डॉक्टरांनी तिला दिली होती.

खरं तर आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी विलक्षण अनुभव असतो. त्यामुळे साराहला हा क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय करायचा होता. म्हणून तिने स्वतःला सिझेरियनसाठी मानसिकरित्या तयार केले. मात्र आपले बाळ डॉक्टरांनी नव्हे तर आपण स्वतः गर्भाबाहेर काढावे, असे तिला वाटले. गर्भातून बाळाला स्वतः काढून त्याला आपल्या छातीशी कवटाळावे, असे तिला वाटू लागले. म्हणजेच साराहला स्वतःची डिलिव्हरी स्वतः करायची होती. तिने आपली ही इच्छा डॉक्टरांकडे बोलून दाखवली. विशेष म्हणजे डॉक्टरांनीसुद्धा तिला ही अशक्य बाब नसल्याचे सांगितले आणि डॉक्टरांच्या योग्य देखरेखीखाली हे शक्य असल्याचे तिला सांगितले. विशेष म्हणजे हा खास क्षण आपल्याकडे छायाचित्रांच्या रुपात नेहमीसाठी साठवून राहावा, यासाठी साराहने एका फोटोग्राफरचीही निवड केली. साराने स्थानिक एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. बाळाचे डोके गर्भातून वर येताच साराहने स्वतः बाळाला बाहेर काढले आणि आपल्या हृदयाशी कवटाळले.
आपल्या बाळाला अशापद्धतीने जन्म दिल्याचा अनुभव अतिशय अद्भुत होता, हा क्षण आपण कधीही विसरु शकणार नाही, असे साराह म्हणाली. साराहने आपल्या लेकीचे नाव टेनेसी असे ठेवले असून ती आता १४ आठवड्यांची झाली आहे. बाळाला स्वतः जन्म देण्याचा क्षण अनुभवण्यासाठी साराहला अनेक काउंसलिंग आणि ट्रेनिंगची मदत घ्यावी लागली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बाळाला जन्म देतानाची साराहची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...