आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडली, क्लिक केले 37 देशांमधील सुंदर तरुणींचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- रोमानियाची फोटोग्राफर मिहेला नोरोकने नोकरी सोडली. कॅमेरा उचलून जगाच्या दौऱ्यावर निघाली. 37 देशांना भेटी देत वेगवेगळ्या संस्कृतींमधील सुंदर तरुणींचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आता तिच्या फोटोंची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. सध्या हे देखणे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
केवळ एका वेबसाईटवर 30 लाख वेळा बघण्यात आले फोटो-
 
तीन वर्षांपूर्वी मिहेला नोरोकने पैसे जमा केले. नोकरी सोडली. त्यानंतर पुढचे दोन वर्षे वेगवेगळे देश फिरण्यासाठी घालवले. तेथील संस्कृती कॅमेऱ्यात टिपली. त्यातील काही फोटो तिने एका वेबसाईटला दिले. हे देखणे फोटो चक्क 30 लाख वेळा बघण्यात आले आहेत. फेसबुक पेजवरही तिने हे फोटो शेअर केले. तिचे सध्या 1,30,000 फॉलोअर्स आहेत.
 
फोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ यांनी दिले या तिच्या स्पेशल फिचर-
 
नोरोकने फोटो सिरिजला 'द एटलस ऑफ ब्यूटी' हे नाव दिले. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असल्याने फोर्ब्ज, सीएनएन, टेलिग्राफ आदींनी तिच्यावर स्पेशल फिचर केले.
 
37 देशांच्या फोटोंमधील बघा निवडक 24-
 
नोरोकने 37 देशातील तरुणींचे फोटो क्लिक केले. त्यातील निवडक 24 फोटो आम्ही वाचकांसाठी निवडले आहेत. 37 देशांमध्ये दौरा करताना तिने तरुणींने अनेक फोटो घेतले होते.
 
यासंदर्भात नोरोक सांगते, की सौंदर्य सर्वत्र आहे. हे दाखविण्यासाठी मी या देशांचा दौरा केला. मला आता जगातील सर्व देशांचा दौरा करायचा आहे. सध्या यासाठी मी फंड गोळा करीत आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, निवडक 24 देशांमधील तरुणींचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...