आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Plays Fox Human Creature For 12 Hours A Day At Pakistan Zoo

मनुष्याचे डोके, कोल्ह्याचे शरीर, जाणून घ्या काय आहे या \'पाकिस्तानी तरुणी\'चे सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची: पाकिस्तानमध्ये राहणा-या एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे नाव मुमताज बेगम आहे. ही तरुणी अर्धी मनुष्य आणि अर्धी कोल्ह्यासारखी दिसते. कराचीच्या एका प्राणीसंग्रहालयात राहणा-या या तरुणीला पाहण्यासाठी दररोज शेकडो लोक येता. मात्र, यामागे वेगळेच सत्य दडले आहे.
काय आहे सत्य...
कराची प्राणीसंग्रहालयात मुमताज एक कॅरेक्टर आहे. की अर्धी कोल्हा आणि अर्धी मनुष्यासारखी दिसते. हे कॅरेक्टर 35 वर्षांचा मुराद अली साकारतो. तो म्हणतो, की पिंज-यात स्वत:ला बंद करून जवळपास 12 तास असेच राहावे लागते. यादरम्यान लोक मला प्रश्नसुध्दा विचारतात आणि मी त्यांना उत्तर देतो. ते मला पाहून आनंदी होतात. माझे फोटो काढतात. अनेक लोकांना वाटते, की मी खरोखर असाच आहे. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी जाणून घेण्याची उत्सूकता वाढते.
एका पर्यटकाने सांगितले, की मी आधी एकटाच आलो होतो. परंतु यावेळी पणतूसोबत आलोय. खरंच मुमताजला असे पाहणे एक वेगळाच अनुभव आहे. मुमताजचा हा रोल आधी मुराजचे वडील करत होते. त्यांचे 18 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मुरादने त्यांची जागा घेतली. तो दिवसातील 12 तास एकाच पोजमध्ये बसलेला असतो. यादरम्यान त्याचे डोके कोल्ह्याच्या धडाजवळ असते. तसेत इतर शरीर टेबलखाली झाकलेले असते. 10 रुपये तिकीट खरेदी करून लोक हा नजारा बघण्यासाठी प्राणीसंग्रहालयात येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या कॅरेक्टरचे PHOTOS...