आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Who Fell Into Coma After Breast Augmentation Surgery

सौंदर्यासाठी ब्रेस्ट सर्जरी करणा-या या तरुणीचे आयुष्य झाले उद्धवस्त, नरकयातना आल्या नशिबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेस्ट ऑग्मेन्टेशन शस्त्रक्रियेचा परिणाम लिंडा पेसेज नावाच्या तरुणीपेक्षा कुणाला चांगला ठाऊक असले. मियामीची रहिवासी असलेल्या 19 वर्षीय लिंडाने ऑगस्ट 2013मध्ये सौंदर्यासाठी ब्रेस्ट ऑग्मेन्टेशनची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेच्या काही वेळानंतर ती कोमात गेली होती. परंतु ती आज कोमाच्या बाहेर आली असली तरी तिला दुस-यांचा आधारानेच चालावे लागत आहे. आता तिला बोलता देखील येत नाही.
डॉक्टरांच्या मते, लिंडा आता कधीच बरी होऊ शकणार नाही. परंतु तिच्या आईला आशा आहे, की लिंडा एक दिवस नक्की बरी होईल.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लिंडाची आई मरिला डिजायने सांगितले, 'मला आजही लिंडा बरी होईल अशी आशा आहे. कारण ती जिवंत आहे आणि सध्या घरी आहे. ती तणावाखाली असल्याने नेहमी रडत असते. तिला चालता येत नाही आणि तिला तिची परिस्थिती पाहून रडू कोसळते.'
लिंडाने ऑगस्ट 2013मध्ये वयाच्या 18व्या वर्षी ब्रेस्ट एनलार्ज शस्त्रक्रिया करुन घेतली होती. शस्त्रक्रियेच्या एका तासानंतर लिंडाच्या मेंदूने काम करणे बंद केले आणि त्यामुळे ती कोमात गेली होती. दोन महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर ती कोमातून बाहेर आली. लिंडाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तिच्या जून्या वैद्यकिय चाचण्यांची पडताळणी करत आहेत. त्यांना वाटतेय, की लिंडाने तिच्या शरीराच्या संबंधीत कोणती तरी मोठी गोष्ट लपवून ठेवली, ज्यामुळे ती कोमात गेली होती.
लिंडा एका मुलाची आई आहे. तिच्या नातेवाईकांनी एका वृत्तपत्राला सांगितले, की ते कोर्टात याचिका दाखल करून लिंडाच्या मुलाचे पालकत्व स्वीकारण्याची मागणी करणार आहेत. तिच्या मुलाचे योग्य संगोपन करण्यासाठी हा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. लिंडाची आई तिच्या मुलीच्या ब्रेस्ट इम्प्लांट शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टराच्या विरोधात खटला दाखल करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर बातमी...