आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला मारण्यासाठी दिली होती सुपारी, आता सोशल साईट्सवर आहे लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियात राहणारी अॅलेना सांझारोव्स्काया सोशल साईट्सवर खूपच लोकप्रिय आहे. तिची ओळख एक फिटनेस गुरु म्हणून आहे. मात्र, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कधी काळी एलेनाने आपला पती अॅलेक्सीला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. पतीला मारण्यासाठी ज्या मित्राला तिने मदत मागितली त्यानेच याबाबतची माहिती पोलिसांना इन्फॉर्म केले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तिला अटक केली. मात्र झाली नाही शिक्षा...
पोलिसांनी अॅलेनाला अटक केल्यानंतर कोर्टात सादर केले. मात्र, कोर्टाने तिला शिक्षा दिली नाही. कोर्टाने आपला निर्णय देताना अॅलेनाला वेडे घोषित करीत स्पेशलाईज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी पाठविण्यात आले. तिच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर तिने मॉस्कोत फिटनेस स्टूडियो खोलला. याचदरम्यान तिचा मुलगा निकिताचा मृत्यू झाला. खरं तर निकिताच्या पायात पेनकिलर इंजेक्शन दिल्याने तो कोमात गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अॅलेना संपूर्ण जगापासून दुरावली.
मात्र, तिने परिस्थितीवर मात केली. 52 वर्षाची अॅलेना रोज इंस्टाग्रामवर आपल्या फिजिकचे फोटोज आणि व्हिडियो अपलोड करते आणि लोकांना फिट राहण्यासाठी सल्ला देते. एवढेच नव्हे तर, आपल्या फॅन्सला ती रिलेशनशिपबाबत माहिती, सल्ला देते. इंस्टाग्रामवर तिला 3 लाख 60 हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. सोशल साईट्सवर अॅलेना खूपच पॉपुलर आहे. याचमुळे तिने नुकताच मॉस्कोत थ्री बेडरूम फ्लॅट खरेदी केला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅलेनाशी संबंधित आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...