आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका उंच पूल यापूर्वी कधी पाहिला आहे? पाहा फ्रान्सच्या केबल ब्रिजचे खास Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फ्रान्सच्या मिलाऊ ब्रिजचे एक छायाचित्र)
जगात अनेक ब्रिज आहेत जे आपल्या वेगळेपणाने लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. असेच एक अमेझिंग ब्रिज फ्रान्समध्ये आहे त्याचे नाव मिलाऊ वियाडक्ट. पश्चिम फ्रान्समध्ये मिलाऊ शहराच्या जवळ टार्न नदीवर बनलेला हा पूल जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखला जातो. याला केबलच्या आधारे बनवण्यात आले आहे.
या पूलाला फ्रान्सचा इंजिनिअर मायकल व्हिलरेजेक्स आणि ब्रिटीश आर्किटेक्ट लॉर्ड नार्मन फोस्टरने डिझाइन केले. त्याची उंची 343 मीटर (1,125 फुट) इतकी आहे. त्याचा एक खंबा 1118 फुट इतका उंच आहे.
तुम्हाला माहित झाल्यास आश्चर्य वाटेल, हा पूल एफिल टॉवरपेक्षा उंच आहे. एफिल टॉवरची उंची 988 फुट इतकी आहे. 2460 मीटर लंबा हा ब्रिज जगातील सर्वात उंच पूलांमध्ये 12व्या क्रमांकावर आहे.
हा ए 75 - ए 71 रस्त्यांचा एक भाग असून तो पॅरिसपासून मॉण्टिपलिरपर्यंत जातो. याच्या निर्मितीचा एकुण खर्च 40 कोटी यूरो इतका आहे. (जवळपास 23.47 अब्ज रुपये) इंजिनिअरसाठी एक आव्हानात्मक हा पूल 14 डिसेंबर 2004मध्ये तयार झाला आणि 16 डिसेंबर रोजी त्याचा वापर करण्यात येऊ लागला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ब्रिजची काही खास छायाचित्रे...