आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World’S Amazing Largest No Kill Cat Sanctuary Has Saved Over 24000 FurballsWorld’S Amazing Largest No Kill Cat Sanctuary Has Saved Over 24000 Furballs

या महिलेने घरात पाळल्या शेकडो मांजरी, जाणून घ्या का करते असे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॅलिफोर्नियाच्या 'द कॅट हाऊस ऑन द किंग्स'मध्ये मांजरींसोबत बसलेली लिनिया लतांजियो)
पृथ्वीवर सध्या मांजरींसाठी कॅलिफोर्नियामध्ये स्वर्ग आहे. 'द कॅट हाऊस ऑन द किंग्स'च्या नावाने प्रसिध्द या घरात सध्या 700 मांजरी राहतात. त्यांना राहण्यासाठी 9 विविध ठिकाणे बनवली आहेत. याला जगतील सर्वात मोठे मांजरींचे अभयारण्य मानले जाते. या सेंच्युअरीची निर्मिती 1992मध्ये करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत एकूण 24 हजार मांजरी येथे पाळल्या आहेत. याची सुरुवात लिनिया लतांजियोने केली होती.
लिनिया म्हणते, 'कोणतीही मांजर पिंज-यात कैद करून ठेवणे मला आवडत नाही. तिला तिचे स्वतंत्र्य मिळायला हवे. त्यामुळे या अभयारण्याची निर्मिती केली आहे. मी रोज अशा मांजरींच्या शोधात असते. ज्या मांजरींना लोक सोडून देतात किंवा रस्त्यावर फिरणा-या मांजरींना मी येथे घेऊन येते.'
या अभयारण्याची छायाचित्रे क्रिस्टिना गँडल्फोने क्लिक केली आहेत. तो लॉस एंजेलिसचा रहिवासी आहे. त्याच्या म्हणणे आहे, की या छायाचित्रांच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की लिनिया आणि तिच्या टीमचे सदस्य मांजरींसाठी किती मेहनत घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्रिस्टिना गँडल्फोने घेतलेली लिनियाच्या अभयारण्याची छायाचित्रे...