आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत बर्फापासून तयार केले हॉटेल, मायनस तापमानात राहातात लोक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वीडनच्या उत्तरेलाजुक्क्सजर्वी गाव जगात बर्फापासून तयार झालेल्या हॉटेलसाठी प्रसिद्ध आहे. येथील तोर्न नदीच्या किनाऱ्यावर २५ वर्षांपासून बर्फापासून हॉटेल तयार करण्यात येते.
उणे 10 डिग्री तापमानात येथे राहण्यासाठी तसेच याला पाहण्यासाठी सुमारे 50 हजार पर्यटक येतात.
डिसेंबर महिन्यापासून येथे पर्यटकांचे येणे सुरू होते. हॉटेल निर्मितीची तयारी ऑक्टोबर महिन्यात सुरू होते आणि डिसेंबरमध्ये पूर्ण केली जाते. याची बांधणी पाहून हे हॉटेल कसे बनवतात याचा अंदाज लावणे कठीण आहे. जगातील 100 कलावंत या निर्मितीच्या कार्याला लागतात. अनेक देशांची कला यात दिसून येते. तसे पाहू जाता तोर्न नदीतील बर्फ जेव्हा वितळू लागतो तेव्हापासून बर्फाचे हॉटेल बांधण्याची तयारी मार्चमध्ये सुरू होते. तेथील बर्फ कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात येतो. बर्फापासून भिंती, भांडी आणि फर्निचर निर्मितीच्या कामास प्रारंभ होतो. या वर्षी येथे 61 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. या खोल्यातील इंटरिअर 11 देशांतील 42 डिझायनर्सनी केले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी हे हॉटेलही वितळून जाते. त्याचे पाणी पुन्हा तोर्न नदीत मिसळते.
पुढील स्‍लाईडवर पाहा बर्फापासून तयार केलेल्‍या हॉटेलची छायाचित्रे...