आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World's Dangerous Road In Norway, Death Road Norway

हा जगातील सर्वात भयावह रस्त्यांपैकी एक 'डेथ रोड', येथून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेथ रोड नावाने प्रसिध्द नॉर्वेचे ट्रॉलस्टिगन रोड
ओस्लो: जगात अनेक रोड आहेत, ज्यावरून प्रवास करण्याची मजाच काही और असते. असे रोड स्थानिक लोकांशिवाय पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतात. परंतु जगात असेही रोड आहेत ज्यावरून चालणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
नॉर्वेमध्ये 'ट्रॅलस्टिगन'सुध्दा एक अशांच रोडपैकी एक आहे. त्याला जगातील सर्वात भयावह रोडमध्ये सामील करण्यात आले आहे. या रोडला 'डेथ रोड' नावाने ओळखले जाते. हा खडकांमधून जाणारा रस्ता आहे. जो नॉर्वेच्या राऊमा शहरच्या अन्डाल्सनेस आणि नॉर्डलच्या वर्डाल गावाला जोडल्या जातो. या रस्त्यावरून रोज जवळपास 2, 500 लोक प्रवास करतात. रस्त्याच्या कडेने खडकातून एक झरासुध्दा वाहतो, जो या रस्त्याच्या सौदर्यांत भर टाकतो. हा झरा 320 मीटर उंच खडकावरून खाली वाहतो.
एका संशोधनानुसार, या रस्तावर प्रत्येक वर्षी जवळपास 200-300 लोकांचा मृत्यू होतो. रस्त्याच्या प्रत्येक धोकादायक वळणावर निशाणी करून ठेवण्यात आली आहे. पाऊल, धुके आणि माती-धूळीमुळे रस्त्यावरील काही भागात अंदूक दिसते. तसेच, काही ठिकाणी रस्ता खराब आहे. त्यामुळे अपघाताच्या शक्यता जास्त आहेत. या रस्त्याची निर्मिती 1928मध्ये सुरु झाली होती. 8 वर्षांत हा रस्ता तयार झाला. या भयावह रस्त्याचे उद्धाटन 31 जुलै 1936 रोजी किंग हाकोन VIIने केले होते.
'डेथ रोड'चच्या भयावह वळणाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...