आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Deadliest Underwater Caves Yucatan Cenotes In Southeast Mexico

या आहेत जगातील सर्वात भयावह गुहा, कोणत्याही वेळी मृत्यूचा करावा लागू शकतो सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिकोच्या दक्षिण भागात गुहांमध्ये इशारा देणारे बोर्ड लावले आहेत. इशारा असा आहे, की या गुहेच्या पाण्यामध्ये जो पोहण्यास येईल त्याला मृत्यूचा सामना करावा लागेल. या गुहेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तिथे जवळपास 125 पेक्षा जास्त मानवी सापळे आढळले आहेत. मॅक्सिकोमध्ये मोठ्या क्षेत्रफळात पसरलेला हा परिसर युकेटन कॅनोट्सच्या नावाने ओळखले जाते. त्याला जगातील सर्वात मोठे आणि भयानक डाइव्हिंग स्पॉटसुध्दा म्हटले जाते.
युकेटन पेनिनसुलामध्ये जमिनीचे तुकडे एकमेकांना धडकल्याने ही दरी बनली आहे. एकेकाळी यांचा उपयोग मनुष्याचे बलिदान देण्यासाठी केला जात होता. या द्वीपकल्पामध्ये 1980 पासून ते आतापर्यंत 6000 गुहांचा शोध लावण्यात आला आहे. 2400 गुहांचा शोध घेताना अनेक लोकांचा त्यात मृत्यू झाला. चॅक मुल कॅनोटमध्ये कुमारी मेरीचे छायाचित्र मृत पावलेल्या लोकांच्या आठवणीसाठी ठेवले गेले आहेत.
पाण्यामध्ये अनेक गुहांच्या बाहेर इशारे देणारे बोर्ड लावलेले आहेत. म्हणजेच पाणी खूप संथ आहे. परंतु काही गुहांमधील पाणी खूपच खळखळ वाहणारे आहे. या गुहांमध्ये एकदा फसल्यानंतर बाहेर निघणे खूप कठिण आहे. या गुहांमध्ये गंधकाचा पाऊस पडत असल्याने सर्वत्र धुसर दिसायला लागते. या खोल पाण्यात हाडे, झाड्यांच्या फांद्या यांचे जाळे आहे. त्यामुळे त्याच्या जाळ्यात आपण कधी अडकू याचा अंदाज नाही.
48 वर्षीय ब्रिटीश छायाचित्रकार लिसा कॉलिन्सने जीव धोक्यात टाकून या गुहेत जाण्याचे धाडस केले. तेथील काही खास छायाचित्रेदेखील कॅमे-यात कैद केली. तुम्हीही या भयावह गुहेच्या आतील छायाचित्रे बघू शकता.
जगातील सर्वात भयानक गुहा बघण्यासाठी पुढील स्लाइड्यवर क्लिक करा...