आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे जगातील सर्वात लठ्ठ महिला, जाणून घ्या कसे आहे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः जगातील सर्वात लठ्ठ महिला सुसैन एमान)
जगात असे अनेक लोक आहेत, जे इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत. अशीच एक महिला म्हणजे एरिजोना येथील रहिवाशी असलेली सुसैन एमान. सुसैनला जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखले जाते. दोन मुलांची आई असलेल्या सुसैनचे वजन तब्बल 343 किलो आहे. शरीर एवढे वजनदार असूनदेखील सुसैन अगदी सामान्य आयुष्य व्यतित करत आहे. आपली दोन्ही मुले आणि पती पार्कर क्लार्कसोबत सुसैन आनंदाने आयुष्य जगत आहे. आज आम्ही तुम्हाला सुसैनच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत.
सुसैनचे पती पार्कर शेफ आहेत. सुसैनला पार्करच्या हातचे जेवण खूप पसंत आहे. क्लार्क सुसैनची खूप काळजी घेतात. शिवाय तिच्या आवडीचे पदार्थ तयार करुन तिला खायला घालतात. डॉक्टरांनी सुसैनला भरपूर व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. तिने व्यायामाला सुरुवातदेखील केली आहे. आपल्या लठ्ठपणाचा परिणाम खासगी आयुष्यावर झाला नसून आपल्या जीवनात खूप आनंदी असल्याचे सुसैनने म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुसैनची खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे...