आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World’S Largest And Longest 3D Street Painting ‘Rhythms Of Youth’ In China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहे जगातील भव्य 3D स्ट्रीट पेंटिंग, पाहा अमेझिंग छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नानजिंग (चीन): जगातील सर्वात भव्य आणि लांब 3D स्ट्रीट पेंटिंग चीनच्या जियांगसू प्रांतच्या नानजिंग शहरात तयार करण्यात आले आहे. त्याची लांबी 365 मीटर असून हे पेंटिंग 2,500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ कव्हर करते. या आर्टवर्कला 'Rhyms of Youth' नाव देण्यात आले आहे. त्यासह त्याने दोन विश्व रेकॉर्ड केले असून पेंटिंग बनवणा-या टीमला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
पेंटिंग बनवण्यासाठी लागले 20 दिवस
11 जून रोजी पेंटिंगचे उद्धाटन कॅम्पस ऑफ द कम्युनिकेशन यूनिव्हर्सिटी ऑफ चायना (CUCN)मध्ये करण्यात आले. पेंटिंगमध्ये शहरिकरण, वाहत्या नद्या, मानवीय आयुष्य, गाड्या, इमारती इत्यादींचे चित्र रेखाटण्यात आले आहेत. या सुंदर आणि अनोख्या पेंटिगला तयार करण्याचे काम सुप्रसिध्द चीनी आर्टिस्ट यांग यांगचुन यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने केले आहे. आर्टिस्टच्या टीमने हे पेंटिग 20 दिवसांमध्ये तयार केले.
सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत केले कष्ट
यांगचुनने सांगितले, की टीम प्रत्येक दिवशी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी अंधार होईपर्यंत काम करत होती. त्याने पुढे सांगितेल, 'आम्ही आमचे सर्व लक्ष आणि वेळ या पेंटिगसाठी घालवला आहे. हे पेंटिंग नानजिंगमध्ये ऑगस्ट महिन्यात होणा-या समर यूथ ऑलम्पिक गेम्सच्या प्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी बनण्यात आले आहे.'
'एमामोर्फिक' तंत्रज्ञानचा वापर
हे 3D पेंटिंग बनवण्यासाठी 'एमामोर्फिक' नावाचे तंत्रज्ञानाचा वापर केला असून आर्टवर्क डिस्टार्टेड फॅशनमध्ये तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पेंटिंग कोणत्याही पॉइंटवरून बघितल्यास ते 3Dच्या स्परुपात दिसते.
जगातील सर्वात भव्य आणि लांब 3D स्ट्रीट पेंटिगची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...