आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे जहाज, यामध्ये आहे 5 स्विमिंगपुल आणि एक गोल्फ फील्डसुध्दा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : क्रूज शिप ओसिस ऑफ वर्ल्ड)

जागतील सर्वात मोठे जहाज असलेले ओसिस ऑफ वर्ल्ड हे नुकतेच नेदरलँडचे दुसरे मोठे शहर असलेल्या रॉटरडॅम पोहोचले. 362 मीटर लांब, 60 मीटर रुंदी आणि 65 मीटर उंची असलेल्या या जहाजात 6360 प्रवासी प्रवास करू शकतात. रॉटरडॅममध्ये या जहाजाला आणण्याचा उद्देश यामध्ये दुरूस्ती करणे हा आहे. या जहाजाचे मालकत्व रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनल जवळ आहे.
या जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणार्‍या लक्झरी सुविधा. या जहाजामध्ये जवलपास 2700 खोल्या आहेत तर 16 डेक्स आहेत. ओपन एअर सेंट्रल पार्क सहित स्ट्रीट, मार्केट, रेस्टॉरंट, बार यांसारख्या जगभरातील अनेक सुख सुविधा या जहाजावर आहेत. यामुळे प्रवाशाला आपण जहाजेवर राहातो आहे असे मुळीच वाटत नाही.
या जहाजामध्ये कसिनोपासून ते छोटे गोल्फ कोर्स, डान्स क्लब, कॉमेडी क्लब, पाच स्विमिंग पूल, व्हॉलीबॉल आणि बास्केट बॉल कोर्टसुध्दा आहे. विशेष म्हणजे या जहाजामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बागीच्याप्रमाणे सुविधाही देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे कॉर्पोरेट मिटिंग्ससाठी हॉलसुध्दा आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, जहातल्या या अत्यंत विशाल जहाजाच्या आतील फोटो, तसेच शेवटच्या स्लाईडवर या जहाजाच्या आतील व्हिडीओ सुध्दा...