आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: एकाचवेळी मारले जातात हजारो साप, जाणून घ्या का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टेक्सासमध्ये सापांना मारताना लोक) - Divya Marathi
(टेक्सासमध्ये सापांना मारताना लोक)
 
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये दरवर्षी वर्ल्ड लार्जेस्ट रॅटलस्नेक राऊंडअपचे आयोजन केले जाते. 4 दिवस चालणा-या सापांना मारण्याच्या या कार्यक्रमात हजारो लोक मोठ्या संख्येत सहभाग घेतात. हे लोक केवळ प्रेक्षकांच्या रुपात येत नाहीत. ते सापांना मारून त्यांची कातडी काढून मांस जमा करतात आणि स्वच्छ केले जाते. साप मारण्याचा हा कार्यक्रम लोक मोठ्या उत्साहात पार पाडतात. रक्ताने माखलेल्या हाताने ते भिंतीवर पेंटींगसुध्दा करतात. हा कार्यक्रम मागील 50 वर्षांपासून टेक्सासमध्ये होत आहे.
 
पहिल्यांदा हा इव्हेंट 59 वर्षांपूर्वी 1958मध्ये झाला होता. याला ज्यूनिअर चॅम्बर ऑफ कॉमर्सने (जेसीस) आयोजित केला होता. याचा हेतू लोकांसाठी धोका निर्माण करणा-या रॅटलस्नेकना कमी करण्याचा होता. दरवर्षी मार्चमध्ये याचे आयोजन केले जाते. अॅनिमल राइट्सशी निगडीत लोक याला बंद करण्याची मागणी करत आहेत. मात्र, जेसीस हे मान्य करायला तयार नाहीत.
 
जेसीस स्पोक्समॅन डॅनी व्हिलियम्सने सांगितले, की रॅटलस्नेक मनुष्य आणि इतर प्राण्यांसाठी धोकादायक आहेत. जर आम्ही यांना मारले नाही तर ते आम्हाला मारून टाकतील. त्यामुळे आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी या फेस्टीव्हलचे आयोजन करतो. 
 
मुलांना सांगितले जाते कसे मारावे साप... 
याला जगातील सर्वात मोठा रॅटलस्नेक राऊंडअप म्हटले जाते. रॅटलस्नेक मनुष्यासाठी धोकादायक नसतो. परंतु रंजक गोष्ट अशी, की सापांना मारण्याच्या या इव्हेंटमध्ये लहान मुलेसुध्दा सामील होतात. हा इव्हेंट सापांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुरु करण्यात आला होता. परंतु आता याला वेगळे रुप आले आहे आणि हा इव्हेंट पाहण्यासाठी जगभरातून लोक टेक्सासमध्ये येतात.       
 
रॅटलस्नेकच्या मासला चिकनसारखी चव... 
येथे फ्राय केलेले रॅटलस्नेक मिळते. याचा स्वाद चिकनसारखा आहे. मात्र सापांना फ्राय करण्यापूर्वी त्याला स्वच्छ केले जाते, जेणेकरून त्याचा मनुष्याचा शरीरावर परिणाम होऊ नये.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टेक्सासचे लोक कसे मारतात सापांना...
बातम्या आणखी आहेत...