आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World\'s Scariest Haunted Theme Park In Auckland Newziland

पाहा भूतांचे पार्क, येथे कुणी दिसते रक्ताने माखलेले तर कुणाचे डोळे दिसतात भयावह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(न्यूझिलँडचे स्पूकर्स थीम पार्क)
जगभरात आपल्या अनोख्या रचनने ओळखले जाणारे स्पूकर्स थीम पार्क जरा हटकेच आहे. न्यूझिलँडच्या ऑकलँडमध्ये स्थित स्पूकर्स थीम पार्कचे वैशिष्टे म्हणजे, येथे भयावह वातावरण तयार केले जाते. जीवघेणे दृश्य आणि सीन तयार करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. रक्ताने माखलेले शरीर, चौहूबाजुंनी किचांळ्याचा आवाज, भितीदायक नजरा, असे मनाला धसका बसणारे वातावरण या पार्कमध्ये तयार केले जाते. हे पार्क खूपच वेगळे आणि भयावह मानले जाते.
या पार्कमध्ये कधी कुणी धापा टाकत येतो, तर कुणी रक्ताने माखलेले शरीर घेऊन तुमच्या समोर उभा राहतो. या थीम पार्कमध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती इतकी घाबरते, की तिचा श्वास थोड्यावेळासाठी रोखून जातो. त्याला तिथून बाहेर पडण्यासाठी विनंती करावी लागते.
येथे फिरायला येणा-या प्रत्येक व्यक्तीचा स्थिती इतकी खराब होते, की भितीने थरथरायला लागतो. असे रोज घडते. परंतु लोकांना हे पार्क एकदा तरी पाहण्याची उत्सूकता अशते, असे या थीम पार्कशी निगडीत लोकांचे म्हणणे आहे.
स्पूकर्स थीम पार्कच्या फेसबुक पेजवर अनेक भयावह फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. सोबतच, बघायला आलेल्या लोकांनी घाबरलेली स्थितीसुध्दा दाखवली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या थीम पार्कची काही भयावह आणि अनोखी छायाचित्रे...