आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा जगातील सर्वात उंच महिलेला, वजन 130 किलो, जेवणात दररोज लागतो 6 किलो भात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ही आहे सिद्दीका परवीन, जगातील सर्वात उंच महिला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2013 मध्ये सिद्दीकाच्या नावाचा समावेश जगातील सर्वात उंच महिला म्हणून झाला आहे. सिद्दीकाचे अलीकडेच एम्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी तिच्या मेंदूतील ट्युमरची गाठ शस्त्रक्रिया करुन काढली. हा ट्युमरच तिची उंची वाढण्यामागचे कारण होता. शस्त्रक्रियेनंतर तिची उंची वाढणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सिद्दीका पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची उंची वाढण्यामागचे कारण 'जायंट इन्वेसिव पॉल्मूनरी ट्यूमर' हा आजार होता. या आजारामुळे तिची उंची 7 फुट 8 इंच झाली.
एम्स हॉस्पिटलमध्ये एंडोक्रायनोलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर निखिल टंडन यांनी सांगितले, की सिद्दीका सहा आठवडे हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
सिद्दीकाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि तिची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...