कॅलिफोर्निया: आतापर्यंत तुम्ही मिस वर्ल्ड, मिस यूनिव्हर्ससारख्या स्पर्धांविषयी ऐकले असेल. मात्र, जगात प्राण्यांसंबंधितसुध्दा अनेक अनोखे कार्यक्रम होतात. असे कार्यक्रम चर्चेत येतात. असाच एक कार्यक्रम कॅलिफोर्नियाच्या पेटालुमामध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जगातील सर्वांत कुरूप डॉगींसाठी आयोजित केला होता. त्यामध्ये जगातील अनेक कुरूप डॉगींनी सहभाग घेतला होता. त्यामधील काही डॉगींच्या शरीरावर केस नव्हते तर काहींचे डोके खूप मोठे होते. तर काही डॉगींचे डोळे मोठे-मोठे होते.
या वर्षीच्या स्पर्धेत पीनट विजेता ठरला आहे. 2 वर्षांचा पीनटच्या शरीरावर जंगली प्राण्यांप्रमाणे केस असून डोळे मोठे होते. दातसुध्दा खूप विचित्र दिसत होते. हे सर्व त्याच्या पर्सनॅलिटीला खूप अशोभनीय होते.
पीनटची मालकिन नॉर्थ केरोलिनाच्या ग्रीन व्हिलाची रहिवासी होली चांडलरने संगितले, की बालपणी पीनटच्या अंगाला भाजले होते. आता तो खूप हेल्दी झाला आहे. चांडलरने आशा व्यक्त केली, की पीनटच्या या विजयाचा अर्थ म्हणजे प्राण्यांवर होणा-या अत्याचाराला आळा बसण्यासाठी काही प्रमाणात मदत करू शकतो. तसेच ती आपल्या डॉगीच्या विजयासाठी मिळालेल्या रकमेमधील 1500 डॉलर (90368 रुपये) इतर श्वानांच्या आरोग्यासाठी दान करणार आहे.
या वर्षी कार्यक्रमचे आयोजन कॅलिफोर्नियाच्या पेटालुमामध्ये सोनोमा-मरिन फएअर ग्राउंड्समध्ये झाले होते. हे आयोजन मागील 26 वर्षांपासून केले जाते. या कार्यक्रमात डॉगींची तीन विविध श्रेणींमध्ये निवड केली जाते. त्यामध्ये असामान्य वैशिष्टे, पर्सनॅलिटी आणि कुरूपतेवर गुण दिले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आलेल्या काही कुरूप डॉगींची छायाचित्रे...