आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! हे आहे जगातील सर्वात भयावह तुरुंग, एकमेकांना मारून मांस खातात कैदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आफ्रिकेतील रवांडा येथील गीताराम सेंट्रेल जेल)
तुरुंग म्हणजे काय? हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या तुरुंगाविषयी सांगतोय, ते जगातील इतर तुरुंगांपेक्षा खूप वेगळे आहे. जवळजवळ सर्वच तुरुंगातील कैद्यांची स्थिती वाईटच असते. मात्र जगभरात काही असे तुरुंग आहेत, जेथे तुरुंगवास भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवाला धोका असतो. असाच एक कैदखाना म्हणजे गीताराम सेंट्रल जेल. हे तुरुंग आफ्रिकेतील रवांडा शहरात आहे. या तुरुंगाची गणना जगभरातील सर्वाधिक भयावह तुरुंगामध्ये केली जाते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, येथे तुरुंगातील सुरक्षाकर्मचा-यांकडून नव्हे, तर कैद्यांकडूनच कैद्यांना धोका असतो. येथे तुरुंगवास भोगत असलेले कैदीच इतर कैद्यांना जीवे मारतात. असे म्हटले जाते, की येथील कैदी इतर कैद्यांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे मांस खातात. या तुरुंगातील कैद्यांची क्षमता खरे तर 600 इतकी आहे. मात्र येथे 7 हजारांहून अधिक कैदींना डांबून ठेवण्यात आले आहे.
या तरुंगात कैद्यांना जागा मिळत नसल्याने त्यांना रात्र-दिवस उभे राहूनच काढावे लागतात. अनेक कैद्यांना गलिच्छ ठिकाणी किंवा ओल्या जागेवरच उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना दुर्धर आजार जडतात. या तुरुंगात दररोज जवळजवळ आठ लोकांचा मृत्यू हा वेगवेगळ्या आजारांमुळे होतो. अनेक सामाजिक संघटनांनी या तुरुंगाविरोधात आवाज उठवला आहे. मात्र बराच विरोध होऊनदेखील कैद्यांचे राहणीमान सुधारलेले नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या भयावह तुरुंगाची काही निवडक छायाचित्रे...