आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नदी स्वच्छ करण्यासाठी केले जातात भीषण स्फोट, वाटते- झाला अण्वस्त्र हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनची ह्वांगहो किंवा ह्वांगहे किंवा ह्वांगहा या नदीला पिवळी नदीसुद्धा म्हटले जाते. पावसाळ्यात या नदीत रेतीचे मोठमोठे ढिगारे जमा होतात. त्यामुळे वर्षातून एकदा या नदीची साफसफाई केली जाते. परंतु, त्यासाठी मोठमोठे स्फोट केले जातात.

चीनची पिवळी नदी ही जगभरात सातव्या क्रमांकाची मोठी नदी आहे. हिची लांबी 5494 किलोमीटर आहे. भारतात गंगा नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. तसाच दर्जा चीनी लोकांनी पिवळ्या नदीला दिला आहे. परंतु, पिवळ्या नदीच्या मध्यम भागात असलेल्या होनान प्रांताच्या जनतेची नदीसंदर्भात जरा वेगळी मते आहेत. या नदीला त्यांनी मातेचा दर्जा दिला असला तरी तिला जिवघेणी नदीही समजले जाते. या नदीच्या किनारयावर असलेले य्वान खो गाव अनेकवेळा महापुराचे बळी ठरते. यावेळी गावातील अनेक घरांचे नुकसान होते आणि काही जण मृत्युमुखीही पडतात.

सुमारे ५०० वर्षांपूर्वी मिंग राजवंश काळात शू नावाच्या एक वरिष्ठ अधिकारयाने नदीच्या काठावर फुलांचे उद्यान तयार केले होते. या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावण्यात आली होती. परंतु, त्यानंतर या नदीत आलेल्या महापूरात नदीने आपला मार्ग बदलला. त्यामुळे उद्यान समुळ नष्ट झाले. तेव्हापासून या जागी पिवळ्या नदीचा घाट तयार झाला आहे. त्याला स्थानिक जनता य्वान खो असे म्हणते. ही नदी आपल्यासोबत पिवळ्या रंगाची रेती घेऊन येते. काही वेळा नदीचा भीषण प्रवाह काठ तोडून शेजारच्या भागांमध्ये शिरतो. त्यामुळे शेती मालाचे मोठे नुकसान होते.
पुढील स्लाईडवर बघा, चीनच्या येलो रिव्हरचे फोटो....असे केले जातात भीषण स्फोट....