आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने आख्खाच्या आख्खा बंगला अमेरिकेत केला शिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये महामार्गाची निर्मिती आणि इतर कारणांमुले ऐतिहासिक इमारतींना दुसरीकडू शिफ्ट करण्यात येत आहे. असे करण्यात चीनने महारथ हासिल केले आहे. याअंतर्गत घराला काही किलोमीटरपर्यंत सरकवण्यात येते. परंतु, जवळपास 15 वर्षांपुर्वीचे एक संपूर्ण घर पॅक करून ते अमेरिकेला पाठवण्याचा पराक्रम चीनींनी केला आहे. एवढेच नाही तर तेथे नेल्यानंतर त्याला उघडून पुन्हा उभे करण्यात आले. यिन यु तांग नावाचे हे घर सध्या मॅसाच्युसेट्स अमेरिकेच्या एका संग्राहलयात स्थापित करण्यात आले आहे.

ही आहे कथा...
- यिन यु तांग या शब्दाचा अर्त होतो, प्रचुर छत्रछाया. 18 शतकाच्या शेवटच्या काळात बनवण्यात आलेल्या या घरात 16 खोल्या आहेत.
- किंग राजसत्तेच्या (1644-1911) दरम्यान चीनच्या  दक्षिण-पश्चिम क्षेत्रात हुइझोऊ येथिल अनहुई गावात हुआंग आडनावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याने हे घर बांधले होते.
- जवळपास दोन शतकांपर्यंत हुआंग परिवार याच घरात राहिला. नंतर 1982 मध्ये परिवारातील शेवटच्या सदस्याने गाव सोडले. त्यानंतर हे घर बंद करण्यात आले.
- नॅन्सी बर्लिनर नावाची एक अमेरिकन स्कॉलर काही चीनी आर्किटेक्चर आणि फर्नीचरवर संशोधन करण्यासाठी चीनमध्ये आली होती. 1996 मध्ये तिने यिन यु तांग घर पाहिले. तेव्हा हुआंग परिवार हे घर विकण्याच्या तयारीत होता.
- नॅन्सी ही बॉस्टनच्या पीबॉडी अॅसेक्स म्यूझियमसाठी काम करत होती. तिच्या शिफारशीमुले म्यूझिअमने घर विकत घेतले.
- त्यानंतर या घराला रिलोकेट करण्याची मोठी आणि खठिण प्रक्रिया सुरू झाली. घराला वेगवेगळ्या हिस्स्यात वाटण्यापूर्वी सविस्तर आर्किटेक्चर ड्रॉइंग बनवण्यात आले, मोज-माप करण्यात आले आणि फोटो काढण्यात आले. 
- त्यानंतर घराचे कौलारू ते पायाचे दगडापर्यंत सर्वकाही वेगवेगळे पॅक करून अमेरिकेत पाठवण्यात आले.  हुइझोऊ ते मॅसाच्युसेट्स दरम्यान अतर जवळपास 12 हजार किलोमिटर आहे.
- यानंतर याला बॉस्टनच्या एका वेअरहाऊसमध्ये उघडण्यात आले. आणि घराला पीबॉडी अॅक्सेस म्यूझिअमच्या जमिनीवर आधी घेण्यात आलेल्या चित्रांच्या आधारे पुन्हा उभे करण्यात आले.

पुढील स्लाइडवर पाहा अमेरिकेतील या चीनी घराचे आणखी काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...