आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित योगा करुन घडवला सुडौल बांधा, ही लेडी पायलट आहे कौतुकास पात्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही सुंदर लेडी पायलट सध्या इंटरनेट सेन्सेशन झाली आहे. सोशल मीडियावर हिचे देखणे फोटो व्हायरल झाले आहेत. क्रोएशियाची रहिवासी असलेली 29 वर्षीय मालिन रेडक्विस्ट व्यवसायाने पायलट आहे. बलाढ्य बोईंग 737 विमान ती उडवते. पण पायलट असणे तिच्या प्रसिद्धीचे कारण नाही. तर तिने योगा करुन असा सुडौल बांधा मिळवला आहे. यासाठी तिचे कौतुक करण्यात येत आहे.
हजारो लोक तिला करतात फॉलो
मालिनला योगाभ्यास आवडतो. ती नियमित योगा करते. त्यात खंड पडू देत नाही. एवढेच नव्हे तर योगा करतानाचे फोटोही काढून घेते. तिचे हे फोटो अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. इन्स्टाग्रामवर तिने टाकलेल्या फोटोंना दणकून रिस्पॉन्स मिळतो. या अकाऊंटवर तिला तब्बल 45 हजार लोक फॉलो करतात. फ्लायमी योगा नावाने तयार करण्यात आलेल्या पेजवर ती फोटो शेअर करते.
आठ वर्षांपासून करत आहे योगा
शीर्ष आसनापासून नटराज आसनापर्यंत सर्वच योगा तिला येतात. 2008 पासून तिने योगा करण्यास सुरवात केली. स्नोबोर्डिंग एक्सीडंटनंतर तिला पाठिचा त्रास सुरु झाला होता. योगाभ्यासाच्या माध्यमातून तिने त्यावर मात केली. यावेळी तिने जिममध्येही व्यायाम करुन बघितला. पण फायदा झाला नाही. तिने अखेर योगावरच भर दिला. आतापर्यंत तिने 37 देशांना भेट दिली आहे. तिला स्वतःचे योग रिसॉर्ट उघडायचे आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मालिनचे योगा करतानाचे फोटो... सोशल मीडियावर हे झाले आहेत व्हायरल...
बातम्या आणखी आहेत...