आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालव्यापाशी खेळणाऱ्या मुलांना मिळाली अशी वस्तू, पूर्ण शहरात उडाली खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडमधील क्रिस्टलेटन येथे 3 मुले एका कालव्याच्या किनाऱ्यावर खेळत होती. ते दोरीमध्ये चुंबक बांधून कालव्यात फेकायचे, जेणेकरून लोखंडी वस्तू त्याला चिकटून बाहेर येईल. अशाच एका प्रयत्नात त्याच्या हाती अशी वस्तू लागली की ती पाहून त्यांचे पालकच भ्यायले नाहीत, तर पूर्ण शहरात खळबळ उडाली.
 
असे आहे प्रकरण...
- क्रिस्टलेटनमध्ये 12 वर्षीय ल्यूक स्टरगेस, त्याची 9 वर्षांची कझन चार्लोट टगी आणि त्यांचा 16 वर्षीय मित्र डिऑन एव्हान्स कालव्याच्या किनारी बसून दोरीने बांधलेले चुंबक पाण्यात फेकत होते.
- तेवढ्यात चुंबकाला एक वस्तू चिकटली. त्यांनी दोरी ओढली, तर काही जड असल्याचे लक्षात आले. ही वस्तू पाण्यातून बाहेर आली, तेव्हा तिन्ही मुले हैराण झाली.
- ही वस्तू नेमकी काय आहे, याबाबत त्यांना कळत नव्हते. परंतु, तिघांत सर्वात मोठ्या असलेल्या डिऑनने अंदाज बांधला की, बहुतेक हँडग्रेनेड असेल. यानंतर ल्यूकने त्याचा फोटो काढून आपल्या मम्मीला पाठवला.
- त्याची मम्मी डॉनने तो फोटो तिचा सैन्यात काम केलेला दीर मार्टिनला दाखवला. मार्टिन म्हणाला, हा खरोखरीचा एक हँडग्रेनेड आहे, तो दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये वापरला जायचा.
- मार्टिनने हेही पाहिले की, या ग्रेनेडमध्ये पिन नाहीये, म्हणजे तो फुटू शकतो. याचा अंदाज येताच तो आणि डॉन कालव्याकडे धावले. यादरम्यान त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली.
-मार्टिन वेगाने कार चालवत होता. त्याच्या शेजारी बसलेली डॉनने मुलांना फोन करून सांगितले की, त्या हँडग्रेनेडपासून ताबडतोब दूर व्हा!
- यादरम्यान पोलिसही कालव्यावरील पुलावर पोहोचले. परंतु, ग्रेनेडजवळ जाण्याऐवजी त्यांनी दूर बसून बॉम्बनाशक पथकाची वाट पाहणे पसंत केले. पोलिसांनी आसपासचे सर्व रस्ते बंद केले, जेणेकरून पथकाला ग्रेनेड नष्ट करता येईल. याची माहिती पसरताच पूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
- दरम्यान, फ्लॅश लाइट चमकवत असलेली बॉम्ब स्क्वॉडची गाडीही पोहोचली. स्क्वॉडच्या लोकांनी मैदानात एक भलामोठा खड्डा खणून त्यात विस्फोट घडवला.
- हा ग्रेनेड कालव्यात 70 वर्षांपासून पडलेला होता. पोलिस म्हणाले की, तो जिवंत बॉम्ब होता आणि कोणत्याही क्षणी फुटू शकला असता. त्यांनी मुले आणि त्यांच्या जागरूक पालकांचे कौतुकही केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हँडग्रेनेड कसा होता आणि संबंधित फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...