आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zach Belden\'s Great Grandma Betty Is Popular On Instagram

अजब नातवाची गजब कल्पना: आजीच्या स्मरणार्थ इंस्टाग्रामवर बनवलेले अकाउंट झपाट्याने झाले लोकप्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजी तशी सर्वांनाच प्रिय असते. तिच्याकडे आईची माया असते आणि वडीलांचे प्रेमही. अशाच एका नातवाने आपल्या आजीची आठवण म्हणून एक भन्नाट कल्पना सुटवली. अमेरिकेमध्ये केंटुकीच्या जेख बेल्डनने त्याच्या पणजीच्या आठवणीत काहीतरी नवीन करण्याचा विचार केला. त्याने आजीला श्रध्दांजली देऊन फोटो शेअरिंग वेबसाइट इंस्टाग्रामवर एक अकाउंट तयार केले. जानेवारीपासून ते आतापर्यंत या अकाउंटचे 66 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
जेख म्हणाला, 'मी कधीच अशी अपेक्षा पण केली नव्हती, की माझ्या आजीला लोक अकाउंटवर इतक्या मोठ्या प्रमाणात पसंत करतील.' जेखने पणजीसह त्याच्या कुटुंबीयांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षणसुध्दा या अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोंमध्ये आजी वर्तमानपत्र वाचताना दिसत आहे, तर काहींमध्ये पोझ देताना दिसते.
इंस्टाग्रामवर लोकप्रिय झालेल्या आजीची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...