आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धक-धक\' गर्ल माधुरी दीक्षितचे अखेर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण, साकारणार ही भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असलेली 'धक-धक' गर्ल माधुरी दीक्षित आपल्या करियरमध्ये एक नवी सुरुवात करत आहे. माधुरी दीक्षितला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'मराठी फिल्म केव्हा करणार'? त्याचे उत्तर आता मिळाले आहे. मात्र माधुरी अद्याप तरी मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून नाही तर निर्मातीच्या भूमिकेत पाऊल ठेवत आहे. 

 

माधुरी दीक्षित तिचे पती श्रीराम नेने यांच्यासोबत मराठी चित्रपटांची निर्मिती करणार आहे. नुकतेच दोघांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेची नोंदणी केली आहे. माधुरी आणि डॉ. नेने यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेचे नाव आर.एन.एम मुविंग पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. या संस्थेने मराठी चित्रपट महामंडळाचे अधिकृत सभासदत्वासाठी निर्माता विभागात नोंदणी अर्ज दिला आहे.  

 

मराठी चित्रपट आता बॉलिवूडलाही भूरळ घालू लागले आहेत. माधुरी दीक्षित सोबतच  बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सुद्धा आपली संस्था नोंदणी केली असून ते देखील मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरणार आहे.   

 

मराठीमध्ये अनेक नव्या विषयांवर चित्रपट निर्मिती होत आहे. राजीव जाधव यांचा नटरंग असेल, त्यासोबतच राजीव पाटील यांच्या जोगवा मुळे इम्प्रेस झाल्याचे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

माधुरीने तिच्या बॉलिवूड करियरमध्ये 80-90चे दशक गाजवले होते. अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली आहे. 'तेजाब' (1988) 'राम लखन' (1989), 'दिल' (1990), 'बेटा' (1992), 'खलनायक' (1993), 'देवदास' (2003) सारख्या अनेक हिट फिल्म माधूरीने दिल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...