आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NUDE चा सेन्सॉर फेरा काही संपेना, रवी जाधव यांनी FB पोस्टमधून व्यक्त केला खेद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूड (चित्रा) चित्रपटाचे पोस्टर. - Divya Marathi
न्यूड (चित्रा) चित्रपटाचे पोस्टर.

मुंबई - न्यूड (चित्रा) या मराठी चित्रपटाचा सेन्सॉरशिपचा फेरा काही संपताना दिसत नाही. गोवा फिल्म फेस्टिव्हल पाठोपाठ आता केरळ चित्रपट महोत्सवातही 'न्यूड'चे स्क्रिनिंग होऊ शकलेले नाही. यासंबंधी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे. 

'न्यूड'चे दिग्दर्शिक रवी जाधव यांनी फेसबुक पोस्टमध्ये सेन्सॉर बोर्डाकडून सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहात असल्याचे म्हटले आहे. 


- रवी जाधव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, 'न्यूड'ची केरळ चित्रपट महोत्सवात निवड झाली होती. केरळ फेस्टिव्हलच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सेन्सॉरेचे Exemption (सूट) मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र चित्रपट सेन्सॉर करुन दाखवावा असे पत्र त्यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आले, त्यामुळे सेन्सॉरचे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

- याआधी गोवा येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही 'न्यूड'ला परवानगी मिळाली नव्हती. त्यासोबतच दक्षिणेतील 'एस.दुर्गा' या चित्रपटाचेही स्क्रिनिंग झाले नव्हते. 

- रवी जाधव यांनी म्हटले आहे, की केरळ चित्रपट महोत्सवाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले. 7 डिसेंबरला चित्रपटाचे सेन्सॉर स्क्रिनिंग झाले आणि त्याच दिवशी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षीत असताना सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांमध्ये चित्रपटाला कोणती श्रेणी ( UA / A )  द्यावी यावरुन मतभेद झाला आणि निर्णय लांबणीवर पडला.

- 8 डिसेंबरला सेन्सॉरचे अधिकारी त्यांच्या निर्णयाबद्दल कळवणार होते, मात्र वेळेवर त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.  यामुळे चित्रपट रसिकांपर्यंत पोहचू शकला नाही, याचा खेद वाटत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. 

 

अनेक यूजर्सने केला रवी जाधव यांना सपोर्ट

- रवी जाधव यांच्या पोस्टवर दोन तासांमध्ये 291 जणांनी रिअॅक्शन नोंदवल्या आहेत. 13 जणांनी ही पोस्ट शेअर केली असून 33 जणांनी त्यावर कॉमेंट केली आहे. 
-एका यूजरने म्हटले आहे, ' या चित्रपटाच्या निमीत्ताने त्या मोजक्या, महत्वाची जागा अडवून बसलेल्या लोकांचे #नागवेपण जगासमोर आला..!!'
- नुकतेच केंद्र सरकारने कंडोमच्या जाहिरातींना रात्री 10 ते 6 या वेळेतच टीव्हीवर जाहिराती प्रसारित करण्याच्या सूचना चॅनल्सला दिल्या आहेत. त्याचा धाका पकडून एका यूजरने म्हटले आहे, 'तुम्हाला पण कंडोम जाहिराती प्रमाणे 10 नंतर स्लॉट दिला नाही म्हणजे झालं ...
सगळंच अतार्किक सुरू आहे असेच खेदाने म्हणावे लागेल .'
- अनेकांनी रवी जाधव यांना आम्ही तुमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रवी जाधव यांची FB पोस्ट...

बातम्या आणखी आहेत...