आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कैवल्य\'चा शांतपणा आत्मसात करायचाय- अमेय वाघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील शांत आणि संगीतप्रेमी "कैवल्य', "शटर'मधला निरागस रिक्षा ड्रायव्हर, कट्यार काळजात घुसली, संगीत मानापमान, गेली एकवीस वर्षे, दळण आदी नाटकांमधून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारा... अशा एक ना अनेक प्रकारच्या अभिनयांद्वारे नवोदित अभिनेता अमेय वाघ सध्या प्रेक्षकांच्या थेट हृदयात जाऊन बसला आहे. "बॉम्ब्ड' आणि "द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर' या इंग्रजी नाटकांतूनही अमेय प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या प्रवासाबद्दल त्याच्याशी बातचीत .

नाटक, मालिका आणि चित्रपटात एकदाच काम?
अमेय- मालिका, चित्रपट तर आहेतच; पण नाटकातही प्रायोगिक, संगीत, व्यावसायिक असे बऱ्याच प्रकारांत मी काम करतो आहे. त्यामुळे सध्या एखाद्या भावनाशील मशीनप्रमाणे काम केल्यासारखं मला वाटायला लागलं आहे. मात्र, यामुळे मी आनंदित आहे.

इंग्रजी नाटकांमधूनही तू अभिनय करतोयस?
अमेय- मी सध्या पुण्यात काही प्रायोगिक नाटकं करतोय. शिवाय आधार खुराणा यांच्या "बॉम्ब्ड' आणि "द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर' नावाच्या नाटकांमधून काम करतोय. अभिनयात कारकीर्द करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका बिहारी युवकाची मी "बॉम्ब्ड'मध्ये भूमिका साकारतोय.

'कट्यार काळजात घुसली' नाटकातील संगीतप्रधान भूमिका कशी वाटते?
अमेय- मुळात मला संगीताची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ही भूमिका खूप जवळची वाटते. दिल दोस्तीतही मला संगीतप्रेमच साकारायला मिळालं हे माझ्यासाठी खरोखरचं गौरवास्पद आहे. मी सध्या संगीत शिकतोय हे विशेष.

मालिकेला अधिक प्राधान्य नव्हतं, मग "दिल दोस्ती दुनियादारी' कशी काय केली?
अमेय- एखादा विषय न आवडल्याने मालिकेला नकार दिल्यामुळे मला मालिकाच करायची नाही, असा विषय कदाचित चर्चेत आला असेल. मुळात मी चांगल्या पटकथेची वाट पाहत होतो. "दिल दोस्ती दुनियादारीचा' कैवल्य माझ्यासाठी ती पटकथा घेऊन आला, असे मला वाटते.

'कैवल्य' आणि "अमेय' यांच्यात किती साम्य आहे?

अमेय- मीसुद्धा कैवल्यप्रमाणेच मित्रांसोबत होस्टेल लाइफ एन्जॉय आहे. कैवल्यचा शांतपणा, निरागसता एक व्यक्ती म्हणून माझ्यात यावी असे मला वाटते. कारण मी मुळात चलबिचल आणि रेस्टलेस व्यक्ती आहे.

(मुलाखत : विवेक एम. राठाेड)
बातम्या आणखी आहेत...