आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्मिला कानिटकरने व्यक्त केली ही खंत; वाचा काय म्हणाली औरंंगाबादच्या कार्यक्रमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या आहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत काम करताना इतिहासातील खलिते, पत्रांचा अभ्यास करण्यास मिळाला. हा एक चांगला अनुभव होता. मात्र, आजच्या पिढीला भारताच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती नसते. काही इंग्रजी शाळांतही हा विषय चांगल्या प्रकारे शिकवला जात नाही, अशी खंत अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारे हिने व्यक्त केली.

संत एकनाथ रंगमंदिरात मराठवाडा कला विकास महामंडळ संंचलित एलोरा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. याच्या उद्घाटनाप्रसंगी ती बोलत होती. पुढे ती म्हणाली की, आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास खूप मोठा आहे. तो आजच्या पिढीला माहीत असावा, मुलांनीदेखील आपापल्या पद्धतीने इतिहास समजवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
टुकूर.. टुकूर, राधा राधा.. माझी कुठे गेली, इश्कवाला लव्ह.. अन् सैराटच्या झिंगाट गाण्यावर चिमुकल्यांनी बहरदार नृत्य सादर करत उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या.

पुढील स्लाइडवर वाचा...ऊर्मिलाने मुलांसोबत गायिले 'टिक...टिक... वाजतेय' गीत

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...