पुणे - दगडू त्याची पराजू (प्राजू) यांची लव्हस्टोरी चितारणाऱ्या ‘टाइमपास - २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी (१ मे) कोटी ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘टाइमपास २’ने रितेश देशमुख याच्या "लय भारी' चित्रपटाचा कोटींच्या ओपनिंगचा विक्रम मोडला आहे.
एरवी मुंबई-पुणे टेरिटरीमध्ये मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतो. पण ‘टाइमपास २’ ने राज्यात सर्वत्र गर्दीचे विक्रम केले आहेत. मराठवाडा, विदर्भ प. महाराष्ट्रातही चित्रपट हाऊसफुल आहे, असे "झी'चे बिझनेसप्रमुख निखिल साने म्हणाले.
"टाइमपास'(१) ला प्रेक्षकांनी असेच डोक्यावर उचलून धरले होते. त्यातील नया है वह, आईबाबा अन् साईबाबाची शप्पथ आदी संवाद तर प्रत्येकाच्या तोंडावर रुळले होते. ‘टाइमपास २’ हा मागील चित्रपटाचा पुढील भाग (सिक्वल) आहे.
मल्टिप्लेक्समध्ये ‘टीपी - २’ चे सध्याचे सर्व ४४ शो पुढील दोन दिवसांची आरक्षणेही हाऊसफुल्ल आहेत. सुगतथोरात, व्यवस्थापक,कोथरूड सिटीप्राइड, पुणे
ग्रँड ओपनिंगचे कारण
टाइमपास- चे गारूड, जोडून आलेल्या सुट्या, प्रभावी मार्केटिंग इतर चित्रपटाची स्पर्धा नसल्याने पुढेही ‘टाइमपास २’ ला अशाच प्रतिसादाची शक्यता आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात सिक्वललाही तुफानी यश मिळणे, ही दुर्मिळ गोष्ट ‘टाइमपास - २’ ने साध्य केली आहे.
कोटींची उड्डाणे
१५ कोटी : मी शिवाजीराजे..
१२ कोटी : नटरंग
२० कोटी : टाइमपास
२५ कोटी : दुनियादारी
१० हजारांवर शो हाऊसफुल्ल
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राज्यात सुमारे ४०० चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे दहा हजाराहून अधिक खेळ (शो) हाऊसफुल्ल झाले असल्याची माहिती "झी' वाहिनीचे बिझनेसप्रमुख निखिल साने यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टीपी 2मधील काही सीन्स...