आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagraj Manjule Says, Archi Is Real Hero Of Sairat Marathi Movie

\'सैराट\' चित्रपटाची खरी हीरो \'आर्ची\'च; दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुरुषांच्या तुलनेत स्त्री हीच खऱ्या अर्थाने जगाची नायक आहे. त्यामुळे ‘आर्ची’ ही व्यक्तिरेखा सैराट चित्रपटाची खरी हीरो आहे. परश्या या तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलापेक्षा अनेक बाबतीत आर्ची धीटपणे पुढाकार घेते. ग्रामीण भागातही अशा स्त्रियांची संख्या वाढतेय, असे प्रतिपादन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.

सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक मंजुळे व परश्याची भूमिका करणारा अभिनेता आकाश ठोसर यांनी दै. दिव्य मराठीच्या माहीम कार्यालयाला गुरुवारी भेट दिली.

मंजुळे म्हणाले, ‘फँड्री चित्रपटाच्या आधीपासूनच मी सैराटची पटकथा लिहित होतो. पण सूर सापडत नव्हता. माझ्या चित्रपटांतील प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत असावी, असे वाटते. आपण जे जगतो त्याचे प्रतिबिंब माझ्याही चित्रपटात येत असतात. सैराटमध्येही आजूबाजूचे वातावरण पाहायला मिळेल. मुलगा कणखर व मुलगी दुबळी समजले जाते. पण सैराटमध्ये मी अगदी विरुद्ध दाखवले आहे. कारण समाजात असे चित्र हळूहळू निर्माण होताना दिसते. स्त्री जागी झाली तर सगळी व्यवस्था स्वच्छ होईल. मुख्य म्हणजे प्रत्येक घरात विद्रोह होईल. आर्चीच्या व्यक्तिरेखेतून हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. मी कोणत्याही जातीपातीचा द्वेष करत नाही. मी ज्या गोष्टीची बांधिलकी मानतो, जे आजूबाजूला दिसते, भावते तेच चित्रपटातून दाखवतो. याच दृष्टिकोनातून फँड्री व आता सैराट चित्रपट बनवला आहे.’

पुढील स्लाइडवर वाचा, अभिनयाची लागली गोडी : आकाश