आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: दोन महिन्यांनंतरही रिंकूची क्रेझ कायम, तिचे नवे फोटो पाहायचे असतील तर क्लिक करा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवस बदलतात असे म्हणतात. मात्र ते कसे बदलतात हे जर कोणी अनुभवलं असेल तर ते म्हणजे सैराटच्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने. अवघ्या दोन महिन्या पूर्वी तिला कोणीच ओळखत नव्हतं. सकाळी उठून शाळेत जाणे, अभ्यास करणे आणि घरी येणे. मित्र मैत्रिणींसोबत खेळणे आणि घरच्यांच्या सहवासात राहाणे.. असेच काहीसे तिचे आयुष्य होते. मात्र 29 एप्रिल म्हणजेच आजच्या दोन महिन्या आधी सैराट रिलिज झाला आणि रिंकूचे संपूर्ण आयुष्यच बदलले.

आज रिंकू एक सेलिब्रिटी आहे. ती सुध्दा साधीसुधी सेलिब्रिटी नाही तर मराठीतील नंबर १ ची अभिनेत्री ती आज बनली आहे. अभिनयाचा 'अ' सुध्दा माहित नसलेल्या रिंकूने आपल्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि थेट राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तर अनेक सुप्रसिध्द हिंदी आणि मराठी सिरियल्समध्ये तिला पाहूणे म्हणून बोलावण्यात आले. त्यात कपील शर्माचा शो असो अथवा माधूरी दिक्षितचा So you think you can dance तसेच मराठीतील 'चला हवा येऊ द्या' या सर्वच मालिकांमध्ये रिंकू आणि सैराटच्या टीमला अतिथि म्हणून बोलावण्यात आले होते.

आज सैराट रिलिज होऊन दोन महिने पुर्ण झाले, मात्र तरीही या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची क्रेझ कायम आहे. त्यातल्या त्यात रिंकूचा फॅन फॉलोवर दिवसेंदिवस वाढतच आहे. मल्टीप्लेक्स संस्कृती सुरु झाल्यापासून ही पहिलीच वेळ असावी जेव्हा एखादा मराठी चित्रपट सलग दोन महिने महाराष्ट्रातील केवळ मेट्रोसिटीजच नव्हे तर खेड्यापाड्यातील चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे.

सैराट चित्रपटाने अनेक उच्चांक गाठावे, तसेच त्यातील कलाकारांना अधिकाधीक यश लाभावे यासाठी दिव्य मराठीकडून हार्दीक शुभेच्छा.

पुढील स्लाईडवर पाहा, रिंकू राजगुरूचे आतापर्यंत कधीच न पाहिलेले फोटो खास तुमच्यासाठी....