आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये तरुणाईचा झिंग झिंग झिंगाट... आर्ची-परशाने केले गुणवंतांचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड येथे शनिवारी परशा अन् आर्चीच्या प्रतीक्षेत तरुणाईचे लोंढेच्या लोंढे स्टेडियमच्या दिशेने सुरू होते. दुपारी 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला पाहुणे आल्यावर साडेसहा वाजता सुरुवात झाली.
आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने दहावी बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा कार्यक्रम होता. दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी तरुणाई महिलांची गर्दी वाढत होती. परंतु अधिकचा पोलिस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. गर्दीला आवरताना पोलिसांना नाकीनऊ आला होता. ‘सैराट’चे कलाकार आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू परशा ऊर्फ आकाश ठोसरसह दिगदर्शक महेश मांजरेकर आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सेलिब्रिटींच्या हजेरीमुळे कन्नड शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. पारशा आर्चीने तरुणांशी संवाद साधताना केवळ गुणवंतांना शुभेच्छा देत अधिक बोलणे टाळले. एकूणच ‘सैराट’च्या कलावंतांनी कन्नडमध्ये झिंग झिंग झिंगाट करून उत्साह भरला होता. शहरात दिवसभर परशा आर्चीची चर्चा होती. कार्यक्रमात गुणवंत 13 मुलांचा सत्कार झाला. या वेळी आ. हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, संजना जाधव आदी उपस्थित होते.
वाहतूक खोळंबली
‘सैराट’ची सेलिब्रिटी जोडी शहरात येणार असल्याने सकाळपासूनच तरुणांची गर्दी होती. सायंकाळी गर्दी वाढल्याने धुळे-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्ची-परशाचे या कार्यक्रमातील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...