आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आर्ची-परशा\'चा आता मुक्काम पोस्ट लोणावळा, नागराजसोबत मेणबद्ध झाले रिंकू-आकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढच्या स्लाईडवर पाहा, आर्ची-परशाचे माप घेतानाचे फोटोज्.. - Divya Marathi
पुढच्या स्लाईडवर पाहा, आर्ची-परशाचे माप घेतानाचे फोटोज्..
पुणे - 'सैराट'ने नुकतीच वर्षपुर्ती साजरी केली आहे. यानिमित्त अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण आता दुग्धशर्करा योग असा आहे, की आर्ची आणि परशाला पाहण्यासाठी तुम्हाला कुठल्या सेटवर जायची गरज पडणार नाही. खुद्द हे दोघे तुमच्या स्वागताला उभे असणार आहेत. लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये नागराज मंजुळेसह आर्ची आणि परशा च्या पुतळ्याची वर्णी लागली आहे. या तिघांचे मेणाचे पुतळे पाहून चाहते फारच आनंदीत झाले आहेत. 
 
२१ ऑगस्ट २०१६ रोजी सैराट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या या चित्रपटाने रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर या नवख्या चेहऱ्यांना भरभरुन प्रेम दिले आणि रातोरात स्टार होणे काय असते याची अनुभुती 'याची देही याची डोळा' या दोघांनीही अनुभवली. या दोघांचीही प्रसिद्धी लक्षात घेता त्यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम हाती घेण्यात आले. आता सर्वच चाहत्यांना आर्ची-परशाची निवांत भेट घेता येणार आहे.  

लोणवळ्यातील सुनील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजसेवक अण्णा हजारे, कपिल देव, अनेक राजकीय व्यक्ती, कलाकार यांचे पुतळे दिमाखात उभे आहेत. आता आर्ची-परशा आणि नागराज मंजुळेच्या आगमनाने हे म्युझियमही 'सैराट' होणार यात शंका नाही. 
बातम्या आणखी आहेत...