आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीग बी सोबत काम केलेल्या बाल कलाकारांना ठेंगा, मग अार्चीवर मेहेरबाणी का ? बोर्डाला नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. ‘सैराट’ फेम 'आर्ची' अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिनेदेखील दहावीची परीक्षा दिली होती. तिला दहावीत 66.40 % गुण मिळाले आहेत. एकही दिवस शाळेत न जाता घरी अभ्यास करुन रिंकूने हे गुण मिळवले आहेत. पण आता तिला मिळालेल्या गुणांमध्ये आणखी 10 गुणांची वाढ होणार आहे.
 
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मिळणार वाढीव गुण... 
रिंकूला दहावीत 500 गुणांपैकी 327 गुण मिळाले. तर कला श्रेणीतील 5 गुण मिळाले होते. हे 5 गुण तिला चित्रकलेसाठी मिळाले होते. आता तिच्या या गुणांमध्ये आणखी 10 गुणांची भर पडणार आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे तिला हे वाढीव गुण मिळणार आहेत. रिंकूला 'सैराट' सिनेमातील भूमिकेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. ज्या विद्यार्थ्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो, त्याला विशेष गुण मिळतात. हे वाढीव 10 गुण रिंकू राजगुरुला मिळाले नव्हते. ते आता देण्याचे बोर्डाने मान्य केले आहे.

व्यावसायिक सिनेमा कला श्रेणीत मोडत नसल्याचा बोर्डाचा निकष असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळेच रिंकूला हे गुण दिले नव्हते. पण अभिनयासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या बालकलाकाराला अतिरिक्त दहा गुण देण्याचा जीआर याचवर्षी जानेवारी 2017 मध्ये काढण्यात आला होता. त्यामुळे आता रिंकूच्या दहावीच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.
 
आर्चीला दहावीत मिळालेले गुण  
मराठी - 83
हिंदी - 87
इंग्रजी - 59
गणित - 48
विज्ञान - 42
समाजशास्त्र - 50
 
दहावीत एकही दिवस शाळेत गेली नाही रिंकू 
गेल्यावर्षी नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ने सिनेसृष्टीला 'याड' लावले होते. बॉक्स ऑफिसवर 'झिंगाट' कामगिरी करत हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. त्यातील आर्ची आणि परश्याची जोडी तर 'सुपरडुपर हिट' झाली होती. आर्चीने तरुणाईला घायाळ केलं होतं. ती जिथे जाईल, तिथे चाहत्यांची झुंबड उडत होती. अशा परिस्थितीत तिला रोज शाळेत जाणे शक्यच होत नव्हते. त्यामुळे दहावीची परीक्षा बाहेरून देण्याचा निर्णय तिने घेतला होता.