आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 Episodes Spl: \'लागिरं...\'च्या सेटवर अशी असते धमाल-मस्ती, बघा ऑन लोकेशन फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 1 मे रोजी छोट्या पडद्यावर दाखल झालेली 'लागिर झालं जी' या मालिकेचे नुकतेच 100 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने मालिकेची निर्माती श्वेता शिंदे हिने संपूर्ण टीमसोबत सेलिब्रेशन केले. सेटवर केक कापून कलाकारांनी सेलिब्रेशन केले.  In Pics: शीतली-अज्याच्या 'लागिर झालं जी' मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण, असे झाले सेलिब्रेशन
 
 
मालिकेच्या शूटिंगच्या फावल्या वेळेतसुद्धा मालिकेतील कलाकार भरपूर धमाल-मस्ती करत असतात. या मालिकेमध्ये असलेल्या पात्रांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. मुख्य भूमिकेत असलेले अजिंक्य आणि शीतल  प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहेत आणि राहूल, विकी, यास्मिन, हर्षवर्धन हे सहकलाकारही तेवढीच लोकप्रियता मिळवत आहेत. शुटिंगच्या सेटवर या सर्व कलाकारांची चांगली केमिस्ट्री जमलेली आहे. ही केमिस्ट्री सोशल मीडियावर त्यांनी शेयर केलेल्या फोटोंमधून दिसत असते.  100 Episodes Spl: आज्या, विक्या अन् शितली.. ही आहेत 'लागिरं..' मधल्या या सर्वांची खरी नावे

मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुटिंगच्या सेटवरील कलाकारांची धमाल आपण आज पाहणार आहोत. पुढील स्लाइड्सवर पाहा, 'लागिरं झालं जी..'च्या सेटवर फावल्या वेळेत क्लिक झालेले कलाकारांचे खास PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...