13व्या थर्ड आय आयशियायी चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन गुरुवारी (1 जानेवारी) रविंद्र मिनी थिएटरमध्ये 'बायोस्कोप' या मराठी सिनेमाने संपन्न होणार आहे.
'बायोस्कोप' हा मराठी सिनेमांतील अभिनव प्रयोग असून चार कवितांवर आधारित आहे. या सिनेमाचे चार भाग चार दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, रवि जाधव, विजू माने आणि गिरीश मोहिते यांनी सिनेमाचे चार भाग दिग्दर्शित केले आहे. प्रत्येक भागाची एक स्वतंत्र कथा आहे. 'बायोस्कोप' सिनेमाची निर्मिती अभय शेवडे यांनी केली आहे.
13वा आशियायी महोत्सव 1 ते 8 जानेवारी या आठवड्यात संपन्न होणार आहे. प्रतिनिधी नोंदणी येत्या 22 डिसेंबरपासून प्रभादेवी रविंद्र नाट्य मंदिरामध्ये सुरु होणार आहे.