आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1st Wedding anniversary:सेटवर जमली श्रुती-गौरवची 'तुझी-माझी लव्ह स्टोरी', पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. 4 डिसेंबर 2016 रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. दोघांची पहिली भेट लग्नाच्या 3 वर्षे अगोदर तुझी-माझी लव्ह स्टोरी या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. 

 

श्रुती आणि गौरवने पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, पुष्कराज चिरपुटकर, संस्कृती बालगुडे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, नेहा पेंडसे यांनी लग्नाला उपस्थिती लावली होती. 

 

लग्नसमारंभावेळी भावूक झाले होते श्रुतीचे मित्रमैत्रिणी..
श्रुती मराठे सांगते, मी आणि गौरवने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी  पार पडल्या याचा मला आनंद आहे. लग्नविधी चालु असताना माझ्या मित्रमैत्रिणींच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांना पाहून मलाही रडू कोसळले. मी रडणार नाही असे ठरवले होते पण मला अश्रु आवरले नाही. लग्नानंतर काही दिवसातच श्रुती आणि गौरव कामावर परतले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, श्रुती-गौरवच्या लग्नाचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...