आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICEवर ‘तुला कळणार नाही’ला मात देत \'बॉईज\' ठरला वरचढ, वाचा फिल्मचे प्लस पॉईंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर 'तुला कळणार नाही' आणि 'बॉईज' हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बॉईज' या चित्रपटाने कमाईत तुला कळणार नाही या चित्रपटाला मागे टाकले आहे. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बॉइज’ने तब्बल 3 कोटी 72 लाखांचा गल्ला जमवला असून, ‘तुला कळणार नाही’ने 1 कोटी 10 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे ‘बॉइज’ने ‘तुला कळणार नाही’ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचे दिसत आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित 'तुला कळणार नाही' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, रसिका सुनील, सुशांत शेलार, निथा शेट्टी हे कलाकार आहेत. तर  विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज'मध्ये पार्थ भालेराव, प्रतिक लाड आणि सुमंत शिंदे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 
'बॉईज' या चित्रपटातून  किशोरवयीन मुलांचे भावविश्व रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटाचे काय आहेत प्लस पॉईंट्स जाणून घेऊयात.. 

लहान तसचे किशोरवयीन मुलांच्या भावभावनांचे, त्यांच्या शालेय ‌विश्वाचे चित्रण करणारे बरेच मराठी चित्रपट येऊन गेले आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री याने दिग्दर्शित केलेल्या 'उबुंटू' या चित्रपटात शालेय वयातील मुलांचे भावविश्व पाहायला मिळणार आहे. शालेय वयातील कथा म्हटली त्यात या वयात कुठच्याही तरी मुलीबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची कहाणीही आपसूक येतेच. त्याप्रमाणे 'शाळा' ही आपल्या शिक्षणासाठी किती महत्त्वाची असते हेही या चित्रपटांतून सांगण्याचा प्रयत्न होत असतो.  काका मुथाई या तामिळ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटात लहान मुलांच्या भावविश्वावर सुंदर भाष्य केले होते. 'शाळा', 'सहा गुण', 'एलिझाबेथ एकादशी', 'किल्ला', 'माझी शाळा', 'यारी दोस्ती', 'टाइमपास', 'बालक पालक' अशा विविध चित्रपटांतून लहान मुले, किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडविलेले आहे. मराठी चित्रपटांमध्ये मुलांच्या भावविश्वावर चित्रपट काढण्याचा (बालचित्रपट नव्हे) एक प्रवाह गेल्या काही वर्षांत छान रुळलेला आहे. याच प्रवाहाचा एक हिस्सा आहे 'बॉइज' हा चित्रपट. किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयाम या सर्व गोष्टींवर बॉइजमधे हलकेफुलके भाष्य करण्यात आले आहे. 
 
पुढे वाचा, काय आहे 'बॉईज' या चित्रपटाची कथा, कसा आहे कलाकारांचा अभिनय, अवधुत गुप्ते यांचे दिग्दर्शन आणि चित्रपटाचे संगीत...
 
बातम्या आणखी आहेत...