आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांपूर्वी कर्करोगाने कायमची हिरावून घेतली मराठी सिनेसृष्टीची चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तळवलकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तनिवेदिका, अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती आणि दिग्दर्शक अशी चतुरस्त्र कारकीर्द घडवत मराठी सिने-नाट्यसृष्टीत उत्तुंग 'झोका' घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना या जगाचा निरोप घेऊन आज 3 वर्षे पूर्ण झाली. 6 ऑगस्ट 2014 रोजी कर्करोगाने त्यांची प्राणज्योत मालवली. 2010 पासून त्या कर्करोगाशी झूंज देत होत्या. अखेर वयाच्या 59 व्या वर्षी त्यांची ही झुंज कायमची संपली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली होती. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मराठी सिनेसृष्टी एकवटली होती. 
 
स्मिता तळवलकर यांच्या प्रवासाविषयी...  
स्मिता तळवलकर यांनी फिलॉसॉफी आणि सायकॉलॉजी विषयात बी.ए. केले होते. याशिवाय मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचे शिक्षणही घेतले होते. 1972 साली त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून वृत्त निवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर 1983 साली अभिनेत्री म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. 1985 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत तर 1986 मध्ये मराठी सिनेमांत त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. 
 
'अस्मिता चित्र' निर्मिती संस्थेची स्थापना... 
1989 साली 'अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करुन पाच दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या 'कळत-नकळत' या सिनेमा चार राष्ट्रीय आणि नऊ राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1992 साली आलेल्या 'चौकट राजा' या सिनेमाला तब्बल 13 राज्य पुरस्कार मिळाले होते. 'तू तिथे मी' या सिनेमाला पाच फिल्म फेअर, 4 स्क्रीन व्हिडीओकॉन अॅवॉर्डस्, 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि 12 राज्य पुरस्कार मिळाले होते. 'सवत माझी लाडकी' या सिनेमाने पाच राज्य पुरस्कार आपल्या नावी केले होते. 
 
टीव्ही मालिकांचीही निर्मिती...
सिनेमांसोबतच त्यांनी पेशवाई, नुपूर, अवंतिका, ऊन-पाऊस, अभिलाषा, अनुपमा, नंदादीप, अर्धांगिनी, गोष्ट एका लग्नाची, गोष्ट एका जप्तीची, सुवासिनी, अभिमान या टीव्ही मालिकांचीही निर्मिती केली होती.  
 
दिग्दर्शिका होत्या स्मिता तळवलकर... 
निर्माती आणि अभिनेत्रीच नव्हे तर त्या एक दिग्दर्शिकासुद्धा होत्या. 'सवत माझी लाडकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना पाच पुरस्कार मिळाले होते. याशिवाय बालाजी टेलिफिल्म्सच्या 'मानो या ना मानो' मालिकेच्या चार भागांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. 40 वर्षे मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमात काम करणा-या स्मिता यांनी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे प्रमुख कार्यवाहपद भूषविले होते.
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कलाकारांनी दिला होता साश्रुनयनांनी स्मिता ताईंना अखेरचा निरोप... 
बातम्या आणखी आहेत...