गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत…
'कट्यार काळजात घुसली' या सुबोध भावे दिग्दर्शित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित silent या दोन्ही मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. 'कट्यार'चे दोन्ही शो हाऊसफुल झाले आहेत. दोन्ही चित्रपटांची एकत्र पत्रकार परिषद झाली. गजेन्द्र अहिरे म्हणाले, ज्या विषयाबद्दल कोणी बोलत नाही त्या child abuse विषयावर ही फिल्म आहे आणि ब्राझील सारख्या देशात तिला प्रतिसाद लाभला 'कट्यार..' बद्दल सुबोध भावे, शंकर आणि सचिन हे तिघेही बोलले.
शंकर महादेवन यांना मराठी चित्रपट कसा केला यावर ते म्हणाले, ''माझी पत्नी आणि मित्र मराठी आहेत. शिवाय लहानपणापासून मी ही गाणी गात आलोय. एक प्रकारे माझ्या डीएनएमध्ये हे नाटक होते.'' सचिन म्हणाले, ''माझ्या चेहऱ्यामुळे मला निगेटिव्ह भूमिका मिळत नव्हत्या. सिनेमा डिजिटल झाला त्यातील निगेटिव्हचा भाग गेला आणि मला निगेटीव भूमिका मिळाली.''
नव्या पिढीला हे नाटक माहीत नव्हते, तेव्हा त्या प्रेक्षकाचा विचार करून काही बदल केलेत का या प्रश्नाला उत्तर देताना सुबोध म्हणाला, 'सहा वर्षांपूर्वी मी कट्यार हे नाटक केले त्या अगोदर मीही शास्त्रीय संगीताला इतका परिचित नव्हतो. पण मग मी केवळ तेच संगीत ऐकू लागले आणि सिनेमा करताना मला वाटले जे संगीत शुद्ध आहे ते तसेच ठेवले पाहिजे. म्हणून मी युवकांना समोर ठेवून काही बदल केला नाही पण युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. काल तर या नाटकाचा पुण्यातील प्रयोग हाउसफुल्ल झाला आणि त्याला आलेले प्रेक्षक 22 ते 30 वयोगटातील होते. शंकरही म्हणाले, आजोबांपासून नातीपर्यंत सर्व प्रेक्षक या चित्रपटासाठी येतोय. तीन वर्षाच्या एका मुलीने त्यांना पाठवलेली गायलेली क्लिप त्यांनी यावेळी वाजवली.
पुढे वाचा, "मॅड मॅक्स : फ्युरी रोड" या हॉलिवूड चित्रपटाच्या साऊंड डिझायनरच्या अनुभवांविषयी...