आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 वर्षाचा झाला हा 'मिस्टर फिट' अभिनेता, 19 वर्षाच्या गर्लफ्रेंडसोबत व्हॅकेशन करतोय एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कॅप्टन व्योम' नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता मिलींद सोमणने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. यावेळी तो त्याच्या 20 वर्षे छोट्या गर्लफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. हे दोघे सध्या नॉर्वे येथे आहेत. मिलींदने दोघांचे काही फोटोही शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मिलींद एव्हरेस्ट कॅम्पवर गेला होता. त्यावेळीही मिलींदने काही फोटो शेअर केले होते. मिलींदचा झाला आहे घटस्फोट..
 
- मिलींद सोमणने जुलै 2006 रोजी फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. 
- Mylene सोबत मिलींदची पहिली भेट 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'च्या सेटवर झाली होती.
- तीन वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 
- वयाच्या 50 व्या वर्षी अल्ट्रामॅरेथॉन जिंकल्यानंतर मिलींदला 'आयरनमॅन' किताब मिळाला होता. 
 
मॉडेल मधू सप्रेसोबत होते अफेअर..
- एक्स मिस इंडिया मॉडल मधू सप्रेसोबत मिलींद सोमणचे अफेअर होते. 
- दोघे एका शूजची नग्न जाहिरात केल्यामुळे चर्चेत आले होते. 
 
अलिशा चिनॉयच्या म्युझिक अल्बमने केला होता डेब्यू..
- सुपरमॉडेल असलेल्या मिलींदने 1995 साली अलिशा चिनॉयच्या मेड इन इंडिया'मधून डेब्यू केला होता. त्यानंतर त्याने (1998-99) साली कॅप्टन व्योम मालिकेत काम केले. 
- मिलींद सोमणने 16 दिसंबर (2002), भेजा फ्राई (2007), भ्रम (2008), नक्षत्र (2010), डेविड (2013) 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
असा बनला आयरनमॅन...
- 19 जुलै 2016 साली ज्यूरिखमध्ये आयरनमॅन स्पर्धा जिंकली. तिथे त्याने 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर साइकिलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग 15 तास 19 मिनटांत पूर्ण केली होती. 
- मिलींदने सांगितले तो 10 वर्षाचा होता तेव्हापासून त्याने स्विमींग करण्यास सुरुवात केली. तो 15 वर्षापासून रनिंगची प्रॅक्टीस करत आहे आणि 2004 साली त्याने हाफ मॅरेथॉन पूर्ण केली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद सोमण आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...