आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य पुरस्कारांमध्ये ‘रिंगण’ सिनेमाने मारली बाजी, ‘सैराट’च्या रिंकूचंही झालं कौतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
५३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ फिल्मला पाच पुरस्कार, ‘डबल सीट’ सिनेमाला पाच पुरस्कार, ‘हलाल’ चित्रपटाला पाच पुरस्कार, ‘रिंगण’ सिनेमाला पाच पुरस्कार, ‘मितवा’ फिल्मला तीन पुरस्कार, ‘रंगा पतंगा’ चित्रपटाला तीन पुरस्कार, ‘दगडी चाळ’ सिनेमाला दोन पुरस्कार, ‘दि सायलेंस’ फिल्मला दोन पुरस्कार, ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाला दोन पुरस्कार, आणि ‘संदूक’ चित्रपटाला एक पुरस्कार मिळालेले आहेत.
अभिनेते जीतेंद्र ह्यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी राजकपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेता अनिल कपूरला गौरवण्यात आलं. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ संकलक व्ही. एन. मयेकर ह्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुबलला देण्यात आला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांचाही ह्यावेळी गौरव करण्यात आला. महेश काळे (सर्वौत्कृष्ट पार्शवगायन), रिंगण (सर्वेत्कृष्ट निर्मिती), मकरंद माने (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, रिंगण), रिंकु राजगुरू (सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सैराट), निशांत रॉय बोंबार्डे ( सर्वोत्कृष्ट लघुपट, दारवठा), मिथून चंद्र चौधरी आणि नयन डोळस (सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट, पायवाट) ह्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांना सन्मानित करून त्यांचं कौतुक करण्यात आलं.
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर भावूक होत अभिनेते जीतेंद्र म्हणाले, “महाराष्ट्रात जन्मलो नसलो, तरीही महाराष्ट्रानेच मला नायक आणि स्टार बनवलं. लहानपणी गिरगावातल्या माझ्या चाळीतून मला आकाश दिसत नसे. पण आकाशात बसलेल्या ‘त्या’ला गिरगावातल्या चाळीत राहणारा मी नक्की दिसेन, आणि ‘तो’ माझं नशीब नक्कीच लिहीत असेल, असा मला विश्वास होता. त्याच विश्वासावर फिल्म इंडस्ट्रीत मी करीयर केलं. आणि त्याचंच हे फळ आहे.”
अनिल कपूरने अभिनेते राज कपूर ह्यांच्या सिनेमातूनच आपल्या करीयरची सुरूवात केली होती. त्यामूळे राज कपूर विशेष योगदान पुरस्कार मिळाल्यावर अनिल कपूर म्हणाले, “मी त्यांना राजअंकल म्हणत असे. त्यांच्या परमवीरचक्र सिनेमात भूमिका मिळावी, म्हणून खडकवासलालाल जाऊन खाकी युनिफॉर्ममध्ये मी फोटो काढला होता. त्या फोटोमूळे मला राजअंकलनी भूमिकाही दिली होती. पूढे तो सिनेमा येऊ शकला नाही. पण त्यांच्या आशिर्वादानेच करीयर सूरू झालं. आणि आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय. त्यामूळे माझ्यासाठी हा पुरस्कार नक्कीच मोठा आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राज्य पुरस्कारांमध्ये कोण ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
बातम्या आणखी आहेत...