आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी सिनेमांनी उमटवली मोहर, कोर्ट, किल्लाला, ख्वाडाचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये 62व्या राष्ट्रीय पुरस्करा सोहळ्याला सुरुवात झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण पार पाडले. विशेष म्हणजे या पुरस्करा सोहळ्यात मराठी सिनेमांनी आपला झेंडा रोवला आहे. त्यामुळे दिल्लीत मराठी सिनेमांचा गरज ऐकायला येतोय. कोर्ट, किल्ला, एलिझाबेथ एकादशी, ख्वाडा या सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.
खालील यादीवरून जाणून घेऊया कोण-कोणत्या मराठी सिनेमांना कोणत्या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे...
सर्वोत्कृष्ट चित्रपट: 'कोर्ट'- सुवर्ण कमळ (दिग्दर्शक- चैतन्य ताम्हाणे)
सर्वोत्कृष्ट लघुपट- 'मित्रा' (दिग्दर्शक- रवी जाधव)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- 'एलिझाबेथ एकादशी' दिग्दर्शक: परेश मोकाशी, कथा: मधुगंधा कुलकर्णी
स्पेशल ज्युरी अॅवार्ड बेस्ट ऑडिओग्राफी चित्रपट: 'ख्वाडा' (दिग्दर्शक- भाऊराव क-हाडे)
विशेष लक्षवेधी पुरस्कार सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म: 'किल्ला' (दिग्दर्शक- अविनाश अरुण विशेष लक्षवेधी भूमिका- पार्थ भाले)
बॉलिवूड जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांना सिनेसृष्टीतील मनाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र प्रकृती ठिक नसल्याने शशी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या सोहळ्यात उपस्थित राहू शकले नाही.
हिंदी सिनेमांमध्ये 'क्वीन' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावत उपस्थित होती. तसेच 'हैदर' सिनेमाला चार श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'हैदर' सिनेमातील बिस्मिल गाण्यासाठी सुखविंदर सिंह यांचा रजत कमळाने सन्मान करण्यात आला. 'नानू अवनल्ला अवलू' या कन्नड सिनेमातील अभिनयासाठी विजय यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'मेरी कॉम'ला लोकप्रिय सिनेमा पुरस्कार प्रदान करण्यात आला.