आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयच्या बॅनरच्या '72 मैल..'ने पुरस्कारामध्ये साधली हॅट‌्ट्रिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(72 मैल एक प्रवास सिनेमाचे एक छायाचित्र)

अश्विनी यार्दी आणि अक्षय कुमारच्या ग्रेजिंग गोट्स पिक्चर्स या चित्रपट निर्मिती कंपनीने '72 मैल-एक प्रवास'या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. नुकतेच महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड‌्स 2013-14 मध्येदेखील या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत.
उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट म्हणून '72 मैल..'ची निवड करण्यात आली होती. राजीव पाटीलने (जोगवा) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. राजीवना उत्तम दिग्दर्शक आणि स्मिता तांबेला उत्तम अॅक्टर म्हणून घोषित करण्यात आले. कादंबरीकार अशोक वाटकर यांच्या कथेवर आधारित असलेली ही कथा 50-60 च्या दशकातील आहे. एक 13 वर्षांचा मुलगा वसतिगृहातून पळून जातो. त्याची भेट एक महिला आणि तिच्या मुलांशी होते. यांच्या संगतीने तो मुलगा मोठा होतो, अशी चित्रपटाची कथा आहे.