आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Adesh Bandekar In Chala Hawa Yeu Dya चला हवा येऊ द्या, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर

विश्वदौ-यानंतर आता थुकरटवाडीत पुन्हा सुरु होणार पाहुण्यांची रेलचेल, हे आहेत पहिले पाहुणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वदौऱ्यानंतर जगभरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ त्याच्या मूळ रूपात रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या कार्यक्रमातील थुकरटवाडीचं आता एक आदर्श गाव झालेलं असून या आदर्श गावाला भेट देण्यासाठी पहिले पाहुणे आले ते म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम वाहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांची सौ. सुचित्रा बांदेकर. या भागाचे अजून एक विशेष आकर्षण म्हणजे, या भागात होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालेल्या वहिनी त्यांनी होम मिनिस्टरमध्ये जिंकलेल्या पैठणी साड्या नेसून मंचावर हजर झाल्या आणि त्यांनी आदेश भावोजी आणि सुचित्रा वाहिनीचं औक्षण केलं. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या शुभहस्ते या नव्या सेटचे उदघाटन करण्यात आले.

 

धमाल मजा मस्तीत रंगलेल्या या भागात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी 'सैराट झाला जी' या गाण्यावर नृत्य देखील केले. 'चला हवा येऊ द्या'ची अतरंगी टीम आणि आदेश भावोजी यांच्यात रंगलेली जुगलबंदी तसेच थुकरटवाडीतील वांदेकर भावोजी आणि ओरिजनल बांदेकर भावोजी यांचा आमना सामना पाहणे रंजक ठरेल आणि प्रेक्षकांना त्यांचा लाफ्टर डोस मिळेल यात शंकाच नाही. 'चला हवा येऊ द्या'चा हा भाग येत्या 16 आणि 17 एप्रिल रोजी प्रेक्षकांना ठरलेल्या वेळेत म्हणजे रात्री साडे नऊ वाजता बघायला मिळणार आहेत.  

 

पुढे बघा, थूकरटवाडीत पोहोचलेल्या आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...