आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 71 Highlights सईवर लागले चिटिंगचे आरोप, आज मेघा रेशममध्ये होणार भांडण

#BBMDay71: सईवर लागले चिटिंगचे आरोप, आज मेघा-रेशममध्ये होणार भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य. बिग बॉस यांनी आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना दिला. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडले. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात आल्या. प्रत्येक जोडीला एक container देण्यात आले, त्या container मध्ये वाळू भरलेली होती. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना इतर जोड्यांच्या container मधील वाळू कमी करायची होती तसेच आपल्या container मधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची होती.

 

या कार्यामध्ये आणि या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून रेशम घराची कॅप्टन असल्या कारणाने तसेच नंदकिशोर हा हुकुमशाहा टास्क उत्तमरीत्या केल्यामुळे सुरक्षित असणार आहेत. रेशम कालच्या टास्कमध्ये संचालकाच्या भूमिकेत होती. या टास्क मध्ये पुष्कर आणि मेघा सुरक्षित ठरले आणि बाकीचे सदस्य म्हणजेच आस्ताद, सई, स्मिता, उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा या आठवड्याच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. हा टास्क खेळत असताना सईवर वारंवार ती चिटिंग करत असल्याचा आरोप लागला. त्यामुळे हे कार्य पुन्हा घेण्यात आले होते.


आज घरात रंगणार दोन टास्क... 
आज बिग बॉस सदस्यांना दोन टास्क सोपवणार आहेत. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता 70 दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची आहे. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना आज आपल्यापैकी अशा पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची आहे. ज्यावरून मेघा आणि रेशममध्ये पहिल्या क्रमांकावर तसेच दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल? यावरून बरेच वाद होणार आहेत. तसेच नंदकिशोर यांचे देखील असेच म्हणणे असणार आहे की, मी देखील मागील दोन आठवड्यामध्ये चर्चा निर्माण केली असल्याने मला देखील या पहिल्या पाच क्रमांकामध्ये जागा मिळायला हवी. तेव्हा सदस्य आता कोणत्या सदस्याला कोणत्या क्रमांकावर उभे करणार ? कोणामध्ये वाद होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.


सदस्य खेळणार 'होऊ दे चर्चा' कार्य... 
आपल्या जगावेगळ्या कृत्याची बातमी झाली की एका रात्रीत खऱ्या अर्थाने नशीब बदलत असं म्हंटल तरी चुकीचे ठरणार नाही. यात काहीजण खरचं काहीतरी जगावेगळ करतात तर काहीजण पब्लिसिटी स्टंट म्हणून असं काहीतरी अतरंगी करतात. जे जगासमोर येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. याच सगळ्याची ब्रेकिंग न्यूज बनते आणि सदर व्यक्ती प्रसिद्धी मिळवते. अश्याचप्रकारची जगावेगळी कृत्य करून घरातील सदस्यांना बातम्यांमध्ये यायचे आहे. त्यामुळेच आज बिग बॉस घरातील सदस्यांना जरा हटके असे “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत.


“होउ दे चर्चा” या कार्यामध्ये रेशम कॅमेरा घेऊन तर मेघा हातामध्ये बूम घेऊन घरामध्ये फिरताना दिसणार आहे. तेव्हा हे कार्य बघताना नक्कीच मज्जा येणार आहे हे नक्की...

 

पुढे बघा, आजच्या भागाची निवडक छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...