आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : लग्नानंतर विनीत मुंबईत तर पत्नी राहणार औरंगाबादला, बघा लग्नाचा अल्बम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदवीर विनित भोंडे  4 मार्च रोजी लग्नाच्या बेडीत अडकला. सोलापूरच्या सोनम पवार या तरुणीची विनीतने जोडीदाराच्या रुपात निवड केली.  औरंगाबाद येथे धुमधडाक्यात विनीत आणि सोनम विवाहबद्ध झाले. गेल्याच महिन्यात विनीत आणि सोनम यांचा घरगुती समारंभात साखरपुडा पार पडला होता.

 

लग्नानंतर विनीत मुंबईला तर सोनम राहणार औरंगाबादला....

विनीत मुळचा औंरगाबादचा आहे. तर अभिनय क्षेत्रात कारकिर्द करत असल्यामुळे तो आता मुंबईत राहतो. दोन वर्षांपूर्वीच मुंबईत त्याने स्वतःचे घर घेतले. त्यामुळे लग्नानंतर विनीत पत्नी सोनमसोबत मुंबईला राहणार का? असा प्रश्न आम्ही त्याला विचारल्यानंतर सोनमने आईवडिलांजवळ औरंगाबादला राहावे, अशी इच्छा त्याने पत्नीकडे व्यक्त केली. तर सोनमनेही त्याच्या या इच्छेचा मान राखत त्याच्या निर्णयाला साथ दिली. त्यामुळे आता लग्नानंतर विनीत मुंबईला तर सोनम औंरगाबादला सासरी राहणार आहे. 

 

अदनाम-निकोबारला जाणार हनीमूनला...

लग्नानंतर हनीमूनसाठी कधी आणि कुठे जाणार असा प्रश्न आम्ही विनीतला विचारल्यानंतर तो म्हणाला, लग्नानंतर लगेचच सोनमची परीक्षा आहे. त्यामुळे तिने सर्वप्रथम अभ्यास करुन परीक्षा द्यावी. त्यानंतर पत्नीला हनीमूनसाठी अंदनाम-निकोबारला घेऊन जाणार असल्याचे विनीतने सांगितले. सोनम बीएस्सी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. 

 

लग्नानंतर नोकरी करणार सोनम... 

सोनम अभ्यासात अतिशय हुशार असल्याचे विनीतने सांगितले. गेल्यावर्षी ती परीक्षेत प्रथम आली होती. यंदाही जास्त मेहनत घेऊन सोनमने परीक्षेत प्रथम यावे, असे विनीत म्हणाला. लग्नानंतर हाऊसवाइफ  न होता नोकरी करणार असल्याचे सोनमने सांगितले.  

 

साध्या पद्धतीने लग्न करायची होती इच्छा...

खरं तर अगदी साध्या पद्धतीने विनीत आणि सोनम यांची लग्न करायची इच्छा होती. पण आईवडील, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या आग्रहास्तव विनीत-सोनमचे धुमधडाक्यात लग्न झाले. औरंगाबाद येथे हा विवाहसोहळा पार पडला. नाचत विनीत लग्नमंडपात पोहोचला. लग्नासाठी  विनीतने शेरवानी तर सोनमने शालूची निवड केली होती. 

 

विनीत आणि सोनम यांच्या लग्नसोहळ्याचे एक्सक्लूझिव्ह फोटोज आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर बघा, विनीत-सोनमचा वेडिंग अल्बम...

बातम्या आणखी आहेत...